केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे आणि वाहतुकीसाठी जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येत आहे. येत्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढावी यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना हिरवी नंबरप्लेट देण्यात असून त्यांना टोलमध्ये सवलत दिली जाणार आहे. याबाबत केंद्रिय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांच्या वेगळ्या ओळखीसाठी देशातील सर्व राज्यांना पत्र लिहून निर्देश जारी केले आहेत.

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांना वेगळी ओळख देण्यासाठी नंबरप्लेट हिरव्या रंगात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर नंबर पांढऱ्या रंगात लिहिला जाणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी राज्यांना पत्र लिहिले आहे. यासंदर्भात नीती आयोगाने केंद्र सरकारसाठी एक प्रस्ताव तयार केला होता. यात केंद्रातील सात मंत्रालय पॉवर, रोड, हेवी इंडस्ट्रीझ यांची मदत घेतली आहे.

Viral video petrol is being poured into the scooter from tansen tobacco pouch
VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ

खासगी टॅक्सीसाठी वापर होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना पार्किंग आणि टोल माफी करण्यात येणार आहे. हा फायदा या वाहनांना होण्यासाठी त्यांची नंबरप्लेट हिरव्या रंगाची असेल. सध्या देशात खासगी वाहनांसाठी पांढरी, टॅक्सीसाठी पिवळी, स्वतः चालक असलेल्या भाड्याच्या वाहनांसाठी काळी आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी निळी नंबरप्लेट असलेली वाहने आहेत. तसेच कंपन्यांच्या कार ज्या शोरूम आणि टेस्ट ड्राईव्हसाठी वापरल्या जातात त्यांच्यासाठी लाल रंगाची नंबरप्लेट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त संरक्षण मंत्रालयाकडून मिलिट्री वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी वेगळ्या प्रकारच्या नंबर जारी केले जातात.यासोबतच राष्ट्रपती आणि गव्हर्नर यांच्या वाहनांसाठी लाल बॅकग्राउंड रजिस्ट्रेशन प्लेटसोबत राष्ट्रीय प्रतीकाचे चिन्ह लावले जाते.