News Flash

Harley Davidson च्या ‘या’ बाइकवर ६५ हजारांची सूट; जाणून घ्या नवी किंमत, स्पेसिफिकेशन्स

दोन बाइक्सवर ५० हजार रुपयांहून अधिक सूट

दुचाकी वाहनांच्या निर्मिती क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्यांपैकी एक म्हणजे अमेरिकेतील हार्ले डेव्हिडसन. महागड्या आणि अलिशान दुचाकी विकणाऱ्या या कंपनीने करोनामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने नवीन योजना आखली आहे. याच योजनेअंतर्गत कंपनीने आपली एन्ट्री लेव्हलच्या स्ट्रीट ७५० या दुचाकीवर घसघशीत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्ट्रीट ७५० ची किंमत ६५ हजारांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता हार्ले डेव्हिडसनची स्ट्रीट ७५० ही भारतातील सर्वात स्वस्त बाईक ५ लाख ३४ हजारांऐवजी ४ लाख ६९ हजारांना उपलब्ध होणार आहे.

कशी आहे स्ट्रीट ७५०?

स्ट्रीट ७५० ही लिमिटेड एडीशन बाइक आहे. या बाइकमध्ये ७४९ सीसी लिक्वीड-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. या इंजिनमुळे ३७५० एरएमपी वर ६० एनएम पीक टॉर्क निर्माण होते. इंजिनला सहा स्पीड गेअरबॉक्स देण्यात आलं आहे. सस्पेन्शनबद्दल बोलायचं झाल्यास बाइकच्या पुढील चाकाला टेलोस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या चाकाला ट्विन शॉक अ‍ॅब्जॉर्बर्स देण्यात आले आहेत. बाइकमध्ये डिस्क ब्रेक आणि ड्यूअल चॅनेस एबीएस तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे.

स्ट्रीट रॉडवरही सूट

यापूर्वी हार्ले डेव्हिडसनने स्ट्रीट रॉडची बीएस सिक्स मानांकन असलेल्या इंजिनच्या किंमतीमध्ये कापात केली होती. ही बाईक आता पाच लाख ९९ हजार रुपयांना उपलब्ध आहे. या बाईकच्या किंमतीमध्ये ५६ हजार ५०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. आधी ही बाइक ६ लाख ५५ हजारांना उपलब्ध होती.

स्ट्रीट ७५० आणि स्ट्रीट रॉडवरील या ऑफर भारतातील सर्व डिलरशीप्सकडे उपलब्ध आहेत. टोकण म्हणून दहा हजार रुपये देऊन बाईक बूक करता येईल. स्ट्रीट ७५० ही ब्लॅक, ग्रे, व्हाइट आणि ऑरेंज अशा चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 2:35 pm

Web Title: harley davidson street 750 receives massive price cut in india scsg 91
Next Stories
1 एसबीआयमध्ये ३८५० जागांसाठी भारती, असा करा अर्ज
2 Video : गेमिंग आणि पॉर्नच्या कनेक्शनची… ‘गोष्ट बालमनाची’
3 टोमॅटो खाण्याचे ६ गुणकारी फायदे
Just Now!
X