31 October 2020

News Flash

‘हे’ आहेत डाळिंब खाण्याचे फायदे

डाळिंबाचे दाणे लगेच खावे

डाळिंबाच्या दाण्याच्याच नाही तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात

‘ईचक दाना, बिचक दाना दाने ऊपर दाना, ईचक दाना’ डाळिंबाचं वर्णन करणारं हे गाणं आपल्या तोंडात चांगलंच बसलं आहे. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणकांसारखे दिसतात. डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तानाकडील फळ आहे. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे डाळिंबाचं पिक घेतलं जातं. डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नाव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ.

– अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्घंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्घंधी निघून जाते.
– ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.
– डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.
– अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.
– जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.
– डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

पण डाळिंब सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खाणे आवश्यक आहे कारण दाणे उशिरा खाल्यानंतर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे स्वाद व चवही कमी होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2017 10:48 am

Web Title: health benifits of pomegranate in marathi
Next Stories
1 सोरायसिसवर नवे औषध बाजारात
2 खुशखबर ! नोकिया आणणार स्वस्तात मस्त स्मार्ट फोन
3 खर्च करण्याच्या ‘या’ पाच सवयी बदला आणि लखपती व्हा!
Just Now!
X