सध्या प्रत्येकाचीच जीवनशैली इतकी बिझी झाली आहे की सगळी गणितं घडाळ्याच्या काट्यावर फीरत असतात. ऑफीसचे ताण, घरातील गोष्टी, प्रवासात जाणारा वेळ आणि इतरही अनेक. या सगळ्या गडबडीत आपले आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष होते. अनेकदा भूक लागूनही वेळेवर खाता येत नाही. सोबत डबा असला तरीही बाहेर खाल्ले जाते तर कधी आणखी काही. काही वेळा या सगळ्यात खाण्याच्या चुकीच्या सवयी अवलंबल्या जातात आणि त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम व्हायला लागतो. त्यामुळे आपल्या आहारात योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. हे बदल केल्यामुळे तुमचे आरोग्य तर चांगले राहतेच पण प्रतिकारशक्ती सुधारण्यासही मदत होते. पाहूयात आहारातील कोणते बदल तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास उपयुक्त ठरतील.

सर्व गोष्टींचे मिश्रण करा

तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि त्याचा तुम्हाला आरोग्यावर परिणाम होऊ द्यायचा नसेल तर सगळ्या गोष्टी एकत्र करुन खायचा पर्याय उत्तम ठरु शकतो. पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असल्याने त्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. त्यामुळे पालेभाज्यांचे ज्यूस करुन पिण्याचा पर्याय उत्तम ठरु शकतो. यामध्ये फॅटसचे प्रमाण कमी असते, त्यामुळे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच या ज्यूसमुळे गोड खाण्याची इच्छा कमी होते.

बाहेर खावे लागले तरी चांगली ऑर्डर द्या

अनेकदा ऑफीसच्या मिटींग्ज किंवा इतर काही कारणांमुळे आपल्याला बाहेर खावे लागू शकते. अशावेळी जंक फूड किंवा इतर काही खाण्यापेक्षा आरोग्याला चांगल्या असलेले पदार्थ ऑर्डर करा. सॅलेड, सूप, ग्रील्ड फीश असे पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या. यामध्ये बरीच पोषणतत्वे असल्याने ते आरोग्यासाठी चांगले असते.

आहारात प्रोटीन पावडरचा समावेश करा

प्रोटीन पावडरबाबत आपल्या मनात अनेक शंका असतात. मात्र प्रोटीन वापडर आरोग्यासाठी अतिशय उत्तम काम करते. प्रोटीन पावडरच्या वापराने तुमचे केवळ आरोग्य चांगले राहत नाही तर स्नायूंच्या बळकटीसाठीही ती अतिशय उपयुक्त ठरते. प्रोटीन पावडरमुळे आहारात सुसूत्रता येण्यास मदत होते.

पाण्याची बाटली कायम सोबत असू द्या

रोज किमान ३ ते ४ लीटर पाणी पिणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. पाण्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक वाहून जाण्यास मदत होते. त्यामुळे शरीर कोणत्याही संसर्गापासून वाचण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही कुठेही असाल तरी तुमच्याजवळ पाण्याची बाटली ठेवा आणि सतत थोडेथोड पाणी पित राहा.

भरपूर फळे खा

फळांमध्ये नैसर्गिकरित्या शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक असतात. फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, लोह, झिंक असे सर्व घटक असतात. या घटकांमुळे शरीर चांगले राहण्यास मदत होते. तसेच फळांमुळे वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यास फायदा होतो. तसेच काही फळे खाण्यास अतिशय सोपी असतात, त्यामुळे तुम्ही कितीही घाईत असाल तरीही फळे खाणे सोपे असते.