मुंबईकरांसाठी हक्काचे खरेदी स्थान म्हणून लोकप्रिय झालेल्या ‘लोकसत्ता’च्या ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ला मुंबईतील अनेक दुकानांमध्ये जोरदार सुरुवात झाली असून या वेळी या फेस्टिव्हलमध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘फू बाई फू’ शोमधून गाजलेली आणि सध्या ‘ती फुलराणी’ नाटकाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री हेमांगी कवी सहभागी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरेदी आणि बक्षीस असा दुहेरी आनंद मिळवून देणाऱ्या ‘लोक सत्ता’च्या ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या विविध ब्रँड्सचे म्हणणे आहे. त्यात या फेस्टिव्हलला नव्या ‘फुलराणी’च्या उपस्थितीमुळे आणखीच रंगत आली. हेमांगीने या फेस्टिव्हलअंतर्गत दादरमधील ‘कला केंद्र’, ‘आर्ट व्हय़ू’, ‘इश प्रज्ञा’ आणि ‘राणेज पर्सेस’ या दुकानांना भेट दिली. यानिमित्ताने, उपस्थितांशी संवाद साधताना ‘अष्टगंध एन्टरटेन्मेंट’ निर्मित आणि ‘अँडोनिस एव्हिएशन एण्टरप्रायजेस’ प्रकाशित ‘ती फुलराणी’ या नाटकाच्या निमित्ताने चांगली भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. गेली अनेक वर्षे मराठी रसिकांवर अधिराज्य गाजविलेल्या ‘ती फुलराणी’ या नाटकात भक्ती बर्वेपासून अमृता सुभाष यांसारख्या दिग्गजांनी काम केले आहे. त्यानंतर मला ही भूमिका साकारायला मिळणे हे माझे भाग्य आहे. सध्या ‘ती फुलराणी’ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे हेमांगीने सांगितले.

‘कला केंद्र’ दुकानाचे मालक विशाल शाह अभिनेत्री हेमांगी कवी यांना ‘लोकसत्ता’ ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने दुकानातील डिझायनर ड्रेसेस दाखवीत आहेत.

या वेळी ‘इश प्रज्ञा’ या साडय़ांच्या दुकानाचे मालक चंदन ओदराणी आणि ‘राणेज पर्सेस’चे निनाद राणे यांनी हेमांगीचे स्वागत केले. ‘कला केंद्र’चे विशाल शाह आणि ‘आर्ट व्हय़’चे विपुल सावला यांनी ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मुळे ग्राहकांना बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत असल्याचे सांगून या उपक्रमाचे स्वागत केले.‘लोकसत्ता’च्या ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांपैकी महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे एका भाग्यवान ग्राहकाला कार व दुसऱ्या भाग्यवान ग्राहकाला ‘केसरी टूर्स’कडून दोन व्यक्तींसाठी सहल यांसह अनेक आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. १७ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे ‘मोहन ग्रुप’ हे मुख्य प्रायोजक असून ‘युनियन बँक’ असोसिएट पार्टनर आहेत. हा महोत्सव पॉवर्ड बाय ‘अपना बाजार’ असून ‘केसरी टूर्स’ ट्रॅव्हल पार्टनर आहेत. त्याचप्रमाणे ‘राणेज पर्सेस’, ‘आर्ट व्हय़ू’, ‘अजय अरविंद खत्री’, ‘केंब्रिज’, ‘इश प्रज्ञा’, ‘मनोरंजन’, ‘ई-जेन’, ‘वास्तू रविराज’ हे गिफ्ट पार्टनर, तर ‘मॉडर्न होमिओपथी’ हे हेल्थ पार्टनर आहेत.

‘लोकसत्ता’च्या ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये ‘इश प्रज्ञा’ या दुकानातील सुंदर साडी नेसण्याचा मोह हेमांगी कवी यांनाही आवरता आला नाही. हेमांगीसोबत छायाचित्रात मालक चंदन ओदराणी.

 

 

 

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemangi kavi in loksatta shopping festival
First published on: 10-04-2016 at 01:05 IST