News Flash

तंदुरुस्त राहण्यासाठी डान्सचा कसा होतो फायदा?

तंदुरुस्त राहण्यासाठी नृत्य हा एक मजेदार मार्ग, नृत्य दिग्दर्शक शामक दावर यांनी सांगितले फायदे आणि महत्त्व

(सांकेतिक छायाचित्र)

सध्या प्रत्येकजण धावपळीच्या जगातही आपल्या आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष देताना दिसतोय. कोणी जिम, योगा, जॉगिंग, घरीच व्यायाम तर काहीजण मेडिटेशन करतात. यामध्ये नेहमी आरोग्याच्या आणि फिटनेसच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या नृत्याचाही समावेश होताना दिसत आहे. कशाप्रकारे तुम्हीही नृत्याद्वारे आपले शारीरिक व मानसिक आरोग्य तंदरुस्त ठेऊ शकता यासंदर्भात प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक शामक दावर यांनी नृत्याचे फायदे आणि महत्त्व सांगितले आहे.

१. तंदुरुस्त राहण्यासाठी नृत्य हा एक मजेदार मार्ग आहे –
आरोग्य ही मनाची स्थिती आहे आणि फिटनेस हे जीवन जगण्याचा मार्ग आहे. तंदरुस्त शरीरामध्ये निरोगी मन असते. नृत्य संपूर्ण फिटनेस, सहनशक्ती, स्नायू टोनिंग आणि मजबुतीकरण करण्यात मदत करते. यात कार्डियोव्हास्कुलर, एरोबिक फिटनेस, कोर आणि लवचिकतेसाठी विस्तार केला जातो. विद्यार्थी एका गटात एकत्रितपणे काम करतात त्यामुळे संघ भावना बळावते. नृत्यासाठी भरपूर सहनशक्ती आवश्यक असते ज्यामुळे शरीर चपळ बनण्यास मदत होते.

२. नृत्य हे मन, शरीर आणि आत्म्यासाठी समग्र क्रिया आहे
शारीरिक क्रियाकल्प आणि सर्जनशील भावनात्मक माध्यमाने नृत्य वापरल्याने, तयार होणारी ऊर्जा कुशलतेने हाताळण्यास मदत करते. नृत्य आणि प्रदर्शन कला कौशल्य, ज्ञान आणि समज विकसित करण्यास मदत करतात. डान्स क्लाससह लोक काहीतरी शोधत असतात आणि त्यांना आवडलेल्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतात. ज्या लोकांना अंतर्दृष्टी समजली जाऊ शकते त्यांना व्यक्त करण्यासाठी एक मंच मिळतो आणि त्यांचे व्यक्तिमत्व सकारात्मकरित्या प्रतिबिंबित होते.

३. नृत्य आपल्याला आपल्या आनंदी ठिकाणी घेऊन जाते
ते फक्त नृत्य किंवा शारीरिक क्रियाकलाप करायला शिकवत नाहीत, तर त्यांना असा अनुभव हि देतात ज्यामुळे त्यांना आत्मविश्वास हि मिळेल. नृत्य ऊर्जा आणि भावना बाहेर सोडण्याचा एक चांगला मार्ग आहे. जेव्हा आपण नृत्य करतो तेव्हा घाम येतो आणि त्याद्वारे आपण एन्डॉर्फिन सोडतो ज्यामुळे आपल्याला आनंद होतो. चांगले संगीत, आनंदी नृत्य हा आनंदी राहण्याचा एक चांगला मार्ग आहे. संगीत एक उपचारात्मक पद्धत आहे. नृत्य म्हणजे संगीताचा प्रत्यक्ष अर्थ काय आहे त्याचे दर्शन होय. चांगलं संगीत आणि चांगलं नृत्य आनंददायी ठेवण्यास मदत करत.

४. नृत्य टीमवर्क शिकवते आणि तणाव कमी करते
व्यवसायात कार्यरत असणारे एक वेगळी जीवनशैली जगतात. नृत्यामध्ये, त्यांना एक स्ट्रेस बस्टर जाणवतो जिथे ते त्यांच्या चिंतांना बाजूला ठेऊ शकतात आणि त्यांच्या आवडत्या गोष्टी करू शकतात. यातून त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते. आजकाल, बरेच कॉर्पोरेट्स कार्यालयांमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना टीम-बिल्डिंग आर्ट फॉर्ममध्ये व्यस्त राहण्यासाठी कामाच्या ठिकाणी / कामाच्या तासांत शिकवण्यासाठी नृत्य कार्यशाळा आयोजित करतात ज्यामुळे त्यांना तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

५. एकूण वाढ आणि सामाजिक कौशल्यांमध्ये नृत्य प्रोत्साहित करते
लहान मुलांसाठी आणि ज्यांनी नृत्य अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. नृत्य विद्यार्थ्यांच्या समग्र वाढीसाठी मदत करते आत्मविश्वास, स्टेज डेअरिंग आणि एकत्र कार्य करणे यासारखे गुण तसेच नृत्यासाठी भरपूर सहनशक्ती आवश्यक येते, शरीरात चपळ आणि लवचिकपणा येतो. शिवाय, समान विचारांची लोकही यामुळे एकत्र येतात.

 नृत्य हा असा एक कला प्रकार आहे जो निरंतर आणि सतत विकसित होतो, म्हणून त्यास नियतकालिकांचा भाग बनविणे आवश्यक आहे. या सर्व सकारात्मक परिणामांना व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या जीवनशैलीचा आणि नित्यक्रमाचा भाग बनवून ते साध्य करता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 3:08 pm

Web Title: how dance makes you healthy and keeps your fitness sas 89
Next Stories
1 ऐकू कमी येतेय? तर जाणून घ्या कोक्लेयर इम्प्लांट्स बद्दलची माहिती
2 उद्यापासून Huawei Band 4 चा सेल, कुठून कराल खरेदी?
3 टॉप स्पीड 310, TVS ची नवीन Apache झाली लाँच
Just Now!
X