18 March 2018

News Flash

गुंतवणुकीचा विचार करताय? हे नक्की वाचा

वेळीच विचार करायला हवा

आदिल शेट्टी | Updated: January 14, 2018 5:12 PM

नवीन वर्ष सुरू होऊन आता १५ दिवस झाले आहेत. आता कर-नियोजन म्हणजेच टॅक्स प्लॅनिंगचा काळ सुरु झाला. परंतु आता शेवटच्या टप्प्यात हा विचार करुन म्हणावा तितका उपयोग होत नाही. कारण गुंतवणूकीची वेळ हातातून निसटून गेलेली असते. आता हे करण्यास उशीर झाला असे तुम्हाला वाटत असेल तर पुढच्या वर्षासाठी आतापासूनच नियोजन केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल आणि ऐनवेळी येणारा ताण टाळता येईल. आता अशा कोणत्या गुंतवणुकी केल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल पाहूया…

आयुर्विमा तुमच्या मिळकतीचा १० पट असला पाहिजे

कर-नियोजनाच्या साधनांमध्ये आयुर्विमा सर्वात महत्वाचा घटक आहे. जर तुम्ही पहिलीच विमा पॉलिसी घेणार असाल, तर आधी एक टर्म पॉलिसी घ्या. याने तुम्हाला तुमच्या वार्षिक मिळकतीच्या १० ते २० पट विमा कव्हर फार कमी प्रीमियम भरून घेता येईल. यामुळे तुम्हाला इतर, गुंतवणूक करून देणाऱ्या विमा पॉलिसी घेण्याची गरज राहाणार नाही ज्यांचे प्रीमियम अधिक असते आणि कव्हर त्या मानाने कमी असते. त्या ऐवजी तुम्ही तुमची बचत अधिक परतावा देणाऱ्या गुंतवणुकींमध्ये लावू शकता.

ईएलएसएस सर्वोत्कृष्ट टॅक्स-सेव्हर ठरू शकतात

एक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम या म्युचुअल फंडांच्या योजना आहेत. सर्व टॅक्स-सेव्हर साधनांपैकी ईएलएसएसचा लॉक-इन कालावधी सर्वात कमी म्हणजेच फक्त तीन वर्षे आहे. यामुळेच याच्या तुलनेत एंडोमेंट पॉलिसी, यूलिप, पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र डावे ठरतात. ईएलएसएसमध्ये तुम्हाला परतावासुद्धा अधिक मिळण्याची शक्यता असते. क्रिसिल एएमएफआय ईएलएसएस फंड परफॉर्मंस इंडेक्सप्रमाणे या म्युचुअल फंडांचा परतावा गेल्या तीन वर्षांसाठी १२.१० टक्के, पाच वर्षांसाठी २२.७९ टक्के, पाच वर्षांसाठी १७.२० टक्के आणि १० वर्षांसाठी १०.५६ टक्के एवढा होता. यामुळेच पीपीएफ किंवा एनएससीच्या तुलनेत ईएलएसएस अधिक आकर्षक आहेत, ज्यांची सध्याच्या परताव्याची दर जवळपास ८ टक्के आहे. ईएलएसएस अधिक आकर्षक यासाठी सुद्धा आहेत की तीन वर्षांनंतर यातून पैसे काढल्यावर तो पैसा १०० टक्के कर-मुक्त असतो. जर तुम्ही ईएलएसएसमध्ये गुंतवणूक करणार असाल, तर तुमच्या गरजेप्रमाणे एकरकमी गुंतवणूक करू शकता.

आरोग्य विमाकडे दुर्लक्ष करू नका

आरोग्य विमा केवळ टॅक्स-नियोजनाच्या कामाचाच नाही तर ही एक गरज आहे. जर आज तुम्ही आरोग्य विमा घेतलेला नाही, तर तुम्ही जोखीम पत्करीत आहात. दवाखान्याचा खर्च लाखांच्या घरात जाणे सहज झालेले आहे. एवढी रक्कम स्वतःच्या खिशातून भरलीत, तर कुटुंबाच्या बचतीची पार वाट लागेल. यासाठी आरोग्य विमा हा सर्वोत्तम उपाय होय. तुमचे वय ३० वर्षे असेल, आणि तंबाखू किंवा इतर व्यसन नसेल तर ४.५ लाख रकमेच्या आयुर्विम्याचे प्रीमियम साधारणपणे ४७२६ एवढाच असतो. मानसिक शांततेसाठी एवढी रक्कम फार नाही. कलम 80डी मध्ये तुम्हाला स्वतः, जोडीदार आणि मुलांसाठी प्रीमियमवर २५ हजारपर्यंत सूट मिळते. तसेच आणखी २५ हजारपर्यंत प्रीमियमवर सूट आई-वडिलांच्या पॉलिसीसाठीसुद्धा मिळते.

फक्त कर-बचत करू नका, संपत्ती निर्माण करा

शेवटी आपण फक्त टॅक्स वाचवण्यासाठी गुतवणूक करणे या मानसिकतेबद्दल बोलूया. कर-बचत करत असतानाच तुम्हाला कर-बचत साधनांपासून संपत्ती निर्माण कशी करता येईल यावर विचार करायला हवा. समजा, तुमची मिळकत ५ लाख एवढी आहे. इतर रक्कम वजा करण्याआधी तुमची कर-पात्र मिळकत फार तर १३ हजार रुपये भरेल. वरील उदाहरणे लक्षात घेता, तुम्ही तुमच्या कर-बचतसाठी ६५०० रुपये प्रीमियमची टर्म पॉलिसी घ्या, ४८०० रुपये प्रीमियमची आरोग्य विमा पॉलिसी घ्या आणि उर्वरित रक्कम एखाद्या पंचतारांकित ईएलएसएस योजनेत गुंतवा. तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी संपत्ती निर्माण करायची आहे. त्यामुळे पंचतारांकित म्युचुअल फंडमध्ये मासिक एसआयपी सुरू करून तुम्ही १५ टक्के चक्रवाढ दराने परतावा मिळवू शकाल. फक्त १० वर्षांत या एसआयपीमुळे तुमचा निधी २० लाख, आणि २० वर्षांत १ कोटीहून अधिक होईल.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार

First Published on January 14, 2018 5:12 pm

Web Title: how to do saving with good options important tips
  1. V
    Vasudeo Kelkar
    Jan 14, 2018 at 5:34 pm
    L I C ha saglyat bekar paryay aahe. Me sarvast jast maar L I C madhe khalla aahe mhanun ha paryay konich swikaru naye.
    Reply