प्रत्येक बदलत्या ऋतूचा परिणाम आपल्या शरीरावर आणि चेहऱ्यावर होत असतो. त्यामुळे आपल्या शरीराची आणि चेहऱ्याची खास काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये अनेक महिला ओठांच्या समस्येने त्रस्त असतात. अनेक जणींचे ओठ फुटतात, काहींचे शुष्क(कोरडे) होतात. त्यामुळे ऋतू कोणताही असला तरी ओठांची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणूनच ओठांची नेमकी काळजी कशी घ्यावी हे पाहुयात.

१.सकाळी आणि रात्री दात घासतांना ब्रश ओठांवरून अलगद फिरवावा, त्यामुळे ओठावरील मृत त्वचा निघून जाते.

२. रात्री झोपताना व्हॅसलिन आणि लिंबाचा रस एकत्र करून ओठांना लावा त्यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होतो.

३. रात्री झोपताना शेंगदाण्याच्या तेलाने ओठावर मसाज करून नंतर सुती कपडय़ाने पुसून घ्या. ओठ नरम राहण्यास मदत होते.

४. ओठ दाताने कुरतडण्याची सवय टाळा, सवयीमुळे ओठांच्या त्वचेला हानी पोहोचते. ओठांचे पापुद्रे निघतात, भेगा पडतात, त्वचा खेचली गेल्याने त्यातून रक्त येते, यामुळे ओठ राठ पडतात.

लिपस्टिक लावताना ‘या’ गोष्टी करा

१. रात्री झोपताना लिपस्टिक स्वच्छ धुऊन त्यावर लीप बाम किंवा तूप लावावे. लिपस्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळे होणारं ओठांचं नुकसान भरून निघतं.

२. लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लीप बाम लावा.

३. त्याचप्रमाणे लिपस्टिक ओठांवर दिर्घकाळ टिकण्यासाठी ती काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून लावली.