News Flash

व्यायामात सातत्य राखण्याच्या सोप्या टिप्स

जाणून घ्या नेमके काय कराल

व्यायामाचा संकल्प आपण अनेकदा करतो. कधी सोमवारपासून तर कधी महिन्याच्या १ तारखेपासून व्यायाम करण्याचे ठरवले जाते, मात्र दोन दिवस होताच या संकल्पाला हरताळ फासण्यात येतो. कधी दोन दिवसांच्या व्यायामाने थकवा आला म्हणून, कधी आळस म्हणून तर कधी आणखी काही कारणाने या व्यायामात सातत्य राखणे अवघड होऊन बसते. अशांनी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या व्यायामात सातत्य राखणे सोपे होईल.

१. मनामध्ये असेल तर तो व्यक्ती सवयीत बांधून घेऊ शकतो. त्यामुळे मनाने ठरवणे गरजेचे आहे.

२. व्यायामाला जायचंय असं ठरल्यावर कपडे, शूज, कुठे जायचे यांसारखे ताण न घेता सकाळी उंबऱ्याच्या बाहेर पडायंचय इतकंच ठरवायचं.

३. व्यायाम करायचा म्हटल्यावर सहा महिने २ वर्ष मी व्यायाम करेन असे न ठरवता मी सात दिवस व्यायाम करेन इतकेच ठरवावे. त्यामुळे सातत्य राखण्यास निश्चित मदत होते.

४. एखाद दिवस व्यायामात खंड पडल्यास त्यात फार मोठा गुन्हा नाही. एक दिवस नाही जमले तरीही दुसऱ्या दिवशी नव्याने सुरु करु शकता. एकदा खंड पडला म्हणून सोडून देणे असे केल्याने सातत्य मोडते.

५. व्यायामात हृदय आणि फुफ्फुसे यांची क्षमता वाढण्यासाठी केलेला व्यायाम, स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी केलेले व्यायाम आणि लवचिकता वाढण्यासाठी केलेला व्यायाम असे व्यायामाचे तीन मुख्य प्रकार आहेत.

६. व्यायाम हा मजा घेत घेत केल्यास त्याचा जास्त छान फायदा होतो. तसेच सुरु केलेल्या व्यायामात वाढ करायची असेल तर ठराविक कालावधीने विशिष्ट व्यायाम करणे वाढवा. त्याचा सातत्य राखण्यास फायदा होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 1:12 pm

Web Title: how to keep continuity in exercise dr nitin patankar easy tips
Next Stories
1 ‘लँबॉर्गिनी’ची शानदार Aventador SVJ भारतात लाँच, किंमत…
2 ‘निसान’ची नवी एसयुव्ही ‘किक्स’ लाँच, किंमत 9.55 लाख रुपये
3 मारुती सुझुकीची नवी Baleno , 11 हजार रुपयांत बुकिंग सुरू
Just Now!
X