कोणत्याही सरकारी कामांसाठी सध्या आधारकार्ड अनिवार्य आहे. शाळा, कॉलेज, बँक खाते आणि सिमकार्ड खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य नसले तरी एका महत्वपूर्ण ओळखपत्र म्हणून आधार कार्ड महत्वाचे आहे. पण काही कारणास्तव तुमचे आधार कार्ड हरवले तर परिस्थिती गंभीर होते आणि आता काय करावे या विचाराने गोंधळायला होते. चिंता करु नका. आता हरवलेले आधार कार्ड पुन्हा एकदा मिळवता येणार आहे. त्यासाठी तासनतास लाईनमध्ये उभे राहण्याचीही गरज नाही. ऑनलाईन पद्धीतेने हरवलेलं आधार कार्ड सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर मिळवता येत आहे.

UIDAI च्या नियमानुसार, ग्राहकांनकडे त्यांचा रजिस्टर मोबाइल नंबर किंवा ईमेल असणे अत्यंत गरजेचे आहे. या नंबरव्दारा हरवलेले आधार कार्ड पुन्हा मिळू शकते. परंतू ग्राहकांकडे तेही नसल्यास ग्राहक ऑनलाइन सेवा माध्यमातून कार्ड रि-प्रिंट करु शकतात.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
How Sugar Can Harm Liver
तुम्ही खाल्लेली साखर, फळे, हवाबंद पदार्थ यकृतावर कसा परिणाम करतात? डॉक्टरांनी सांगितलं, ‘साखरेच्या कराचं’ महत्त्व
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

आधारच्या ऑफिशियल ट्विटर खात्यावर एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. त्यामध्ये ग्राहकांना रजिस्टर आधार नंबर किंवा ईमेल लक्षात नसल्यास आधार कार्ड कसे रि-प्रिंट करावे हे दाखवण्यात आले आहे. तसेच त्यासाठी सध्या वापर असलेला मोबाइल नंबर टाकावा लागतो ज्यावर एक OTP येतो. ग्राहक ऑनलाइन resident.uidai.gov.in/aadhaar-reprint व्दारा आधार कार्ड रि-प्रिंट करु शकता.

नव्या मोबाइल नंबरसाठी ग्राहकांनी पुढील गोष्टी कराव्यात:
१. uidai.gov.in वर जावे
२.Order Aadhaar Reprint वर क्लिक करावे
३.आधार नंबर टाका आणि उरलेली माहिती भरा
४.वेरिफिकेशनसाठी नवा मोबाइल नंबर टाकावा
५.रि-प्रिंट करण्यासाठी ५० रुपये भरावे लागतात. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर सर्विस रिक्वेस्ट नंबर (SRN) मिळेल
६.दिलेल्या पत्यावर आधर कार्ड घरी पोहोचेल.