News Flash

झुरळांपासून सुटका करुन घेण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन पाहा

जाणून घ्या उपाय...

झुरळ म्हटलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. घरातील अस्वच्छ ठिकाणी बऱ्याच वेळा झुरळांचा वावर असतो. पण या नावडत्या कीटकांना घरातून हद्दपार कसे करावयाचे? असा प्रश्न सर्वांना पडतोच. त्यांना मारण्यासाठी चपलेपासून अत्यंत महागड्या कीटकनाशकांपर्यंतचे उपाय योजले जातात. काहीजणं घरातील झुरळ घालवण्यासाठी पेस्टकंट्रोलही करता. तरीही या कोणत्याच उपायांना दाद न देणारी ही अत्यंत कोडगी अशी जात आहे. आपल्याकडे दोन प्रकारची झुरळे मोठया प्रमाणावर आढळतात. काळ्या किंवा लाल रंगाची अमेरिकन झुरळे (पेरिप्लानेटा अमेरिकन) या झुरळांपासून सुटका करायची असेल तर हे घरगुती उपाय नक्कीच करुन पाहा.

>>घरात झुरळ फिरत असलेल्या ठिकाणी कडूलिंबाच्या पानांचे तेल किंवा पावडर टाकावी. कडूलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या उग्र दर्पामुळे झुरळ लवकर मरतात. जर झुरळांपासून सुटका हवी असेल तर हे उपाय एकदा नक्की करुन पाहा.

>>घरात स्वच्छता ठेवावी.

>>तमालपत्राचा वास काहीसा उग्र असतो. त्यामुळे घरातील ज्या भागामध्ये झुरळांचा वावर जास्त आहे. त्या ठिकाणच्या कोपऱ्यांमध्ये तमालपत्रांची पानं चुरगळून ठेवावीत. ती हवेने उडू नयेत म्हणून एका पातळ कपड्यामध्येही तुम्ही बांधून ठेवू शकता.

>>बोरिक पावडर आणि साखर समप्रमाणात घेऊन हे मिश्रण एकत्र करुन घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवावी. खासकरुन ज्या ठिकाणी अंधार आणि ओलावा आहे अशा जागेवर ही पावडर टाकावी.

>>चवीला तीक्ष्ण आणि तसाच वास असलेली लवंग जशी आजारपणात गुणकारी ठरते तशीच ती झुरळांना पळवून लावण्यासाठीही मदत करते. त्यामुळे झुरळ ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी लवंग ठेवावीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 7:23 pm

Web Title: how to rid of cockroaches from kitchen avb 95
Next Stories
1 स्वस्तात Poco X3 PRO खरेदी करण्याची आज संधी, जाणून घ्या सविस्तर
2 स्वस्त झाला ‘जंबो बॅटरी’चा दमदार Samsung Galaxy M21, जाणून घ्या नवीन किंमत आणि फिचर्स
3 नाही ‘लीक’ झाला Clubhouse च्या १३ लाख युजर्सचा ‘डेटा’, CEO म्हणाले हॅकिंगचा दावा ‘दिशाभूल करणारा’
Just Now!
X