News Flash

अनोळखी फेसबुक फ्रेण्डला प्रत्यक्षात भेटायला जाताना ही काळजी घ्या

व्हर्च्युअल फ्रेण्डसला भेटायला जाताना विशेष काळजी घ्या

अनेकजण एकमेकांना केवळ सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ओळखतात (संग्रहित प्रतिकात्मक फोटो)

फेसबुकवरील मित्राने केली आर्थिक फसवणूक, फेसबुक फ्रेण्डने केले लैंगिक शोषण यासारख्या मथळ्याच्या बातम्या अनेकदा आपण वाचल्या असतील. सध्याच्या जगात अनेकजण एकमेकांना केवळ सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ओळखतात. प्रत्यक्षात या दोन व्यक्ती एकमेकांना कधीही भेटलेल्या नसतात. इंटरनेटच्या माध्यमातून खास करुन सोशल मिडिया किंवा डेटींग अॅप्सच्या माध्यमातून एकमेकांना ओळखणाऱ्यांची संख्याही खूप जास्त असते. मात्र, वाढत्या फसवणुकीच्या घटना आणि एकंदरित सुरक्षेच्यादृष्टीने व्हर्च्युअल फ्रेण्डसला भेटायला जाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

जाणून घ्या खास टिप्स

– व्हर्च्युअल माध्यमातून भेटलेल्या व्यक्तीला भेटायला जातना शक्यतो एकट्याने जाणे टाळावे. एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपल्या सोबत घेऊन जावे.

– मोबाईल न विसरता न्यावा. काही चुकीचे घडत असल्याची शंका जरी मनात आली तरी अनेक अॅप्सच्या मदतीने तुमच्या पालकांना तसेच जवळच्या मित्रांना तुम्ही मेसेज आणि लोकेशन पाठवू शकता.

– खाजगीत भेटणे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी  जिथे तुमच्या आजूबाजूला जास्त लोक असतील अशा ठिकाणी भेटावे.

– तुम्ही त्या व्यक्तीला भेटायला कुठे जात आहात हे घरी किंवा जवळच्या मित्रांना सांगून जा.

– तुम्ही त्या व्यक्तीला भेटायला गेला असाल तेव्हा तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीला अधूनमधून तुम्हाला फोन करायला सांगा.

– जोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रत्यक्षात भेटत नाही तोपर्यंत कोणतेही आश्वासन देऊन नका.

– अशा व्हर्च्युअल फ्रेण्डला पहिल्यांदा भेटताना केवळ हस्तांदोलन करा. त्याला मिठी मारणे टाळाच.

– पहिल्याच भेटीमध्ये आपल्या खूप खाजगी गोष्टी त्या व्यक्तीबरोबर शेअर करणे टाळा.

– कोणत्याही प्रकारची आर्थिक देवणघेवाण करु नका.

– आपले पासवर्ड, बँकेच्या संदर्भातील माहिती, पत्ता यासारख्या गोष्टी शेअर करणे टाळा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 4:23 pm

Web Title: how to stay safe when meeting your virtual friend in real life
Next Stories
1 …म्हणून सोशल मीडियावरील वादावादीत लोक संतापतात!
2 वैज्ञानिकांनी शोधले नवीन ‘लव्ह हार्मोन’
3 म्हणून खारवलेले पिस्ते अतिप्रमाणात खाऊ नये
Just Now!
X