भारताच्या बहुतांश भागात हवामान सुखद झाले आहे. त्यामुळे येते काही महिने गारेगार थंडीचे असतील. अनेकजण थंडीच्या या दिवसांमध्ये भटकंती करायला जातात. अनेकजण असेही आहेत, की ज्यांना या थंडीचा आणि गारेगार वातावरणाचा अनुभव उंचावरच्या ठिकाणी जाऊन घ्यायला आवडते. पण हे ऐकायला चांगले वाटत असले तरी थंडीच्या काळात गाडी चालवणे हे अनेक बाबतीत धोकादायक असते आणि थंड वातावरणात गाडी चालवण्यासाठी गाडीची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. आम्ही येथे काही टिप्स देत आहोत, ज्यामुळे तुमच्या सहली अधिक संस्मरणीय होतील….

तपासणी शिबीर
थंडीच्या काळात विनाअडथळा आणि सुरक्षित गाडी चालवण्यासाठी अधिकृत सेवा केंद्रातून प्रशिक्षित आणि योग्य पात्रतेच्या तंत्रज्ञांकडून गाडीची तपासणी करून घ्या. कार्यशाळेत गाडीची तपासणी करून घेत असताना तुम्ही विंडशिल्ड पॉलिशिंग, हेड लाइट रिस्टोरेशन, सायलेन्सर कोटिंग, अंडरबॉडी ट्रीटमेंट अशा काही मूल्यवर्धित सेवांचा लाभही घेऊ शकता, ज्यामुळे विशेषतः थंडीच्या काळात गाडी चालवणे अधिक सुकर बनेल.

टायरची तपासणी
टायरमध्ये हवेचा दाब नेहमीच शिफारस केलेल्या पातळीइतका ठेवा, नियमित अंतराने व्हील अलाइनमेंट करा आणि खराब झालेले टायर वेळेवर बदला

इंजिन ऑइलची तपासणी
तेलाची पातळी खूप कमी नसेल, याची काळजी घ्या आणि त्यात सातत्य ठेवा. गाडीने सर्वोत्तम कामगिरी करावी, यासाठी गाडीच्या उत्पादक कंपनीने शिफारस केलेल्या तेलाचाच वापर करत आहात, याची व्हेईकल ओनर्स मॅन्युअल वाचून खात्री करून घ्या.

वायपर्सची तपासणी
वायपरमुळे विंडस्क्रीनवर पाण्याचे डाग अथवा पाण्याची रेषा मागे राहात नाही ना, याची खात्री करण्यासाठी वायपरच्या पातीची तपासणी करा. जर या दोन्हीपैकी एक गोष्ट होत असेल तर वायपर बदलण्याची वेळ आली आहे, कारण पावसाळ्याच्या मौसमात तुम्हाला दररोज वायपर वापरावे लागतात. त्याचबरोबर वायपरसाठीची पाण्याची नलिका नेहमी पूर्णपणे भरलेली असेल, याचीही खबरदारी घ्या.

हीटर युनिटची तपासणी (एचएव्हीसी)
थंडीने पूर्णतः ताबा घेण्याच्या आधीच गाडीतील हीटर युनिट योग्यरित्या काम करत आहे की नाही, याची तपासणी करून घ्या. याच माध्यमातून विंडशिल्डवर जमा होणाऱ्या दवबिंदूंना वितळवण्याचेही काम केले जात असल्यामुळे गाडी चालवताना समोरचे योग्यरित्या व सुस्पष्ट दिसावे, यासाठी याची तपासणी अवश्य करून घ्या. थंडीच्या काळात धुरक्याचा (धुके आणि धूर यांचे मिश्रण) त्रास होऊ नये, यासाठी एसीच्या चाळणीचीही (फिल्टर) तपासणी करा.

इलेक्ट्रिकल चेक
थंडीच्या महिन्यांमध्ये धुक्याची समस्या नेहमीचीच आहे, ज्यामुळे दृष्यमानता कमी होऊन वाहन चालवणे अवघड बनते. त्यामुळे गाडीच्या इलेक्ट्रिकल भागांची तपासणी महत्त्वाची असते. हेडलाइट्स (निम्न व उच्चस्तरीय असे दोन्ही), ब्रेक लाइट्स आणि हॅझार्ड/इंडिकेटर्स असे गाडीतील सर्व दिवे एकत्ररित्या व्यवस्थित काम करत आहेत की नाही, हे तपासा. दिवे मंदावत आहेत किंवा मिणमिणत आहेत, असे आढळल्यास त्वरित अधिकृत सेवा केंद्रातून तपासणी करा.

बॅटरीची तपासणी
तुमच्या गाडीची बॅटरी योग्यरित्या काम करत आहे की नाही, हे तपासणेही महत्त्वाचे आहे. आवश्यकता असेल तर बॅटरी बदला. मान्सूनच्या काळात लाइट्स, वायपर्स यांसारख्या इलेक्ट्रिकल घटकांच्या वापरावर ताण येतो.

गाडी सुरू करणे
जर तुम्ही रोज गाडीचा वापर करत नसाल तर गाडीतील इंधन व वंगण व्यवस्थितरित्या काम करत आहे याची खातरजमा करण्यासाठी आणि बॅटरीचे आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी गाडी सुरू करण्याची खबरदारी घ्या.

या अशा सोप्या उपाययोजना केल्या तरी गाडी बंद पडण्याची शक्यता खूप कमी होईल. संपूर्ण निरोगी अवस्थेतील गाडीसह थंडीचा आनंद लुटा….

(या टिप्स निसान मोटर इंडियाचे अधिकारी अतुल अगरवाल यांनी दिल्या आहेत)