News Flash

आयडिया देणार १० जीबीपर्यंत मोफत डेटा

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोननंतर वोल्ट सेवा देणारी आयडिया चौथी कंपनी आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कायमच वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करत असतात. या ऑफर्समुळे ग्राहकही कंपन्यांची सेवा घेतात. अर्थात यामध्ये दोघांचाही फायदाच असतो. जिओने काही दिवसांपूर्वी आपली फुटबॉल ऑफर सादर केली होती. यानंतर या स्पर्धेत एअरटेल आणि आता आयडीयानेही उडी घेतली आहे. आयडिया कंपनीने आपल्या सहा सर्कलमध्ये ४ जी सेवांमध्ये बदल करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि गोवा, गुजरात, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे. ग्राहकांना वेगवेगळ्या आकर्षक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. ही सेवा २ मे पासून लागू झाल्याचे कंपनीने सांगितले आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोननंतर वोल्ट सेवा देणारी आयडिया चौथी कंपनी आहे.

पहिला वोल्ट कॉल केल्यावर आयडियाच्या ग्राहकांना ४८ तासांच्या आत १० जीबी डेटा मिळेल. या वोल्ट कॉलिंगसाठीचे शुल्क ग्राहकांच्या नियमित कॉलिंगनुसारच लागेल. आयडिया सेल्युलरचे मुख्य मार्केटींग अधिकारी शशि शंकर म्हणाले, आयडिया वोल्टचा लाँच ग्राहकांना डिजिटल युगाशी जोडण्यासाठी करण्यात येत आहे. आयडियाच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा आमचे ध्येय आहे.

या वोल्ट सुविधेचा ग्राहकांना चांगला फायदा होईल. त्यामुळे इंटरनेट कॉलिंग सुलभ होणार आहे. वोल्टमुळे केवळ ४ जी नाही तर ३ जी आणि २ जी वापरणाऱ्यांनाही चांगले नेटवर्क मिळेल आणि इंटरनेट कॉलिंग करता येईल. यामध्ये तुम्ही ४ जी नेटवर्कच्या बाहेर असालत तरीही तुमचा कॉल डिसकनेक्ट न होता प्रवासादरम्यान नेटवर्क बदलले तरीही कॉल सुरु राहील. ४ जी हॅंडसेट आणि ४ जी कार्ड असणाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. जे आधीपासून आयडियाची सेवा वापरत आहेत अशांची सेवा वोल्ट सर्व्हीसमध्ये अपग्रेड होईल. आता ही सेवा Honor 5C, Honor 6X, Honor 7X, Honor view 10, Honor 9 lit, Honor 9 I या हँडसेटमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय येत्या काळात RedMi4, Samsung J7pro, Samsung Galaxy A5, Samsung Galaxy A7, OnePlus 5T, Nokia 3, Nokia 5, Vivo V7 या फोनमध्ये उपलब्ध होईल असे एका पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 11:57 am

Web Title: idea cellular announced 4g volte services change and mile stone in service
Next Stories
1 गोव्यात बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध
2 प्रदूषणामुळे लहान मुलांना दम्याचा धोका
3 व्हॉट्सअॅपच्या व्हिडीयो कॉलिंगमध्ये आणखी एका फिचरचा समावेश
Just Now!
X