29 September 2020

News Flash

१४९ रुपयांमध्ये आयडीया देणार ३३ जीबी डेटा

अतिशय कमी किमतीत इंटरनेट देण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा

रिलायन्स जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी आयडियाने एक नवीन प्लॅन आणला आहे. इंटरनेटचे दर दिवसेंदिवस कमी होत असताना स्पर्धेत आपला टिकाव लागावा यासाठी कंपन्या ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. २८ दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज २५० मिनिटे आणि आठवड्याला १००० मिनिटे मोफत कॉलिंग करता येणार आहे. तसेच तब्बल ३३ जीबी डेटा मिळणार आहे. याबरोबरच रोज १०० मेसेज मोफत मिळणार आहेत. सध्या हा प्लॅन केवळ कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये लागू होणार आहे. त्यानंतर तो देशाच्या इतर भागातही लागू करण्यात येईल. हा प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला असून त्यांना अतिशय स्वस्तात इंटरनेट मिळणार आहे.

नुकतेच वोडाफोन आणि आयडिया एकत्र झाले असून या दोन्ही कंपन्यांनी मिळून ६ कॉम्बो पॅक लाँच केले होते. जिओच्या १४९ रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी कंपनीने हा प्लॅन आणला आहे. सध्या जिओच्या या प्लॅनमध्ये दिवसाला १.५ जीबी डेटा मिळतो. याबरोबरच अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० मेसेज मोफतही मिळतात. या प्लॅनची व्हॉलिडीटीही २८ दिवसांचीच आहे. काही दिवसांपूर्वी एअरटेलनेही जिओला टक्कर देण्यासाठी १९५ रुपयांचा प्लॅन जाहीर केला होता. यातही रोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो. म्हणजेच महिन्याला ४२ जीबी डेटा मिळतो. आयडियाचा हा १४९ रुपयांचा प्लॅन त्या प्लॅनलाही टक्कर देणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 2:42 pm

Web Title: idea launch 149 recharge plan to compete with jio and airtel
Next Stories
1 International Coffee Day : जाणून घ्या कॉफीच्या शोधाची रंजक गोष्ट
2 International Coffee Day : हे आहेत कॉफी पिण्याचे फायदे
3 International Coffee Day : जगातील महागडी कॉफी तयार होते उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून
Just Now!
X