News Flash

जेवणानंतर ऑफिसमध्ये झोप आल्यास करा ‘हे’ उपाय

काही सोप्या टिप्स

जेवण झाल्यावर शरीर जड होणे आणि त्यामुळे झोप येणे ही अतिशय सामान्य बाब आहे. घरी असलो आणि त्यातही पोटभर जेवलो की आपण सुटीच्या दिवशी ताणूनही देतो. पण ऑफिसमध्येही जेवण झाल्यावर अनेकांना झोप येते. अशाप्रकारे जेवणानंतर झोप येण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये दिवसभराच्या कामाने आलेला थकवा, रात्रीची अपुरी झोप आणि प्रमाणापेक्षा जास्त जेवण ही कारणे असू शकतात.

१. सकाळी ऑफिसला आल्यापासून आपण बराच वेळ एकाच प्रकारचे काम करत असतो. ठराविक वेळाने वेगळे काम केले तर आपल्याला कंटाळा येत नाही. त्यामुळे जेवण झाल्यावर कामाचे स्वरुप बदला. त्यामुळे तुम्हाला थोडासा बदल होईल आणि पुढील काम तुम्ही जोमाने करु शकाल.

२. जेवणानंतर लगेचच कामाच्या ठिकाणी बसणे टाळा. त्यामुळे जास्त झोप येते. ऑफिसच्या खाली किंवा बाहेरच्या बाजूला एखादी चक्कर मारुन या. तुम्हाला कोणाला फोन करायचा असल्यास तो करुन या. ऑफिसमधील एखाद्या मित्र-मैत्रिणीशी गप्पा मारा. त्यामुळे नकळतच तुमची झोप उडेल.

३. जेवणानंतर येणारी झोप जाण्यासाठी तोंडात एखादी गोळी किंवा च्युईंगम चघळल्यास झोप जाण्यास मदत होते. तोंडाची हालचाल झाल्याने आपण नकळत सक्रीय होतो. त्यामुळे झोप घालविण्यासाठी हाही एक उत्तम पर्याय आहे.

४. ऑफिसमधील दुपारचे जेवण नेहमीपेक्षा थोडेसे कमीच करा. त्यामुळे आलेली झोप जाण्यास मदत होईल. जेवणानंतर गोड खाण्याची सवय असेल तर ती बदला. कारण गोड खाल्ल्याने कायम झोप येते. ही सवय बदलल्यास झोप येण्याची समस्या निर्माण होणार नाही.

५. दुपारच्या जेवणात भरपूर खाल्ल्यास नक्कीच झोप येते. त्यामुळे हलके पदार्थ खा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2017 3:58 pm

Web Title: if you are facing problem of sleep after lunch in office try this things
Next Stories
1 ‘या’ गोष्टींमुळे वजन कमी करण्याचे प्रयत्न होतात अयशस्वी 
2 मोबाईलमध्ये एकच नंबर अनेकदा सेव्ह झालाय? असे करा डिलीट
3 पिंपल्स येऊ नयेत म्हणून ‘हे’ पदार्थ टाळा
Just Now!
X