हाँगकाँगची बजेट स्मार्टफोन बनवणारी कंपनी इन्फिनिक्सने गेल्या महिन्यात आपले दोन लेटेस्ट स्वस्त स्मार्टफोन Infinix hot 9 आणि Infinix Hot 9 Pro लाँच केले. यापैकी Infinix hot 9 या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी आज (दि.13) भारतात सेलचं आयोजन करण्यात आलं. फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजेपासून या फोनच्या सेलला सुरूवात झाली आहे.

Infinix Hot 9 चे फीचर्स :-
इन्फिनिक्स हॉट 9 (infinix hot 9) हा फोन म्हणजे गेल्या वर्षी आलेल्या इन्फिनिक्स हॉट 8 या स्मार्टफोनची पुढील आवृत्ती आहे. कमी किंमतीत ‘क्वाड रिअर कॅमेरा’ सेटअप आणि दमदार बॅटरी ही फोनची खासियत आहे. फोनच्या मागील बाजूला 13 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. तर 8MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह एकूण पाच कॅमेरे या फोनमध्ये आहेत. पंच होल डिस्प्ले असलेल्या या फोनची डिझाइनही एखाद्या महागड्या फोनप्रमाणे आहे.या फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असून मीडियाटेक हीलियो पी22 प्रोसेसर देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज आहे. माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. फिंगरप्रिंट सेंसर हे फीचर असलेल्या या फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड सपोर्ट असून हा फोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही देण्यात आली आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5, जीपीएस/ए-जीपीएस आहे.

किंमत :-
इन्फिनिक्स हॉट 9 च्या 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत कंपनीने 8,499 रुपये ठेवली आहे.