News Flash

6,999 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आणि भन्नाट फीचर्स, Infinix Smart 3 Plus चा सेल सुरू

स्मार्टफोनच्या मागील बाजूला तीन रिअर कॅमेरे, फिंगरप्रिंट सेंसर आणि पुढील बाजूला वॉटरड्रॉप नॉच

इनफिनिक्स (Infinix) कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपला नवा स्मार्टफोन Infinix Smart 3 Plus लाँच केला. आजपासून या स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर सेल सुरू झाला आहे.

या स्मार्टफोनच्या मागील बाजूला तीन रिअर कॅमेरे, फिंगरप्रिंट सेंसर आणि पुढील बाजूला वॉटरड्रॉप नॉच आहे. Infinix Smart 3 Plus च्या वैशिष्ट्यांबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये 6.21 इंचाचा डिस्प्ले, 3,500 एमएएच क्षमतेची बॅटरी, फेस अनलॉक सपोर्ट आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) हा स्मार्टफोन दोन कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये एफ/1.8 13 मेगापिक्सल सेंसर, 2 मेगापिक्सल सेंसर आणि एक लो–लाइट सेंसर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये एआय ब्युटीमोड आणि स्क्रीन फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. अँन्ड्रॉइड 9 पायवर आधारित एक्सओएस 5.0 वर कार्यरत असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरही आहे. फोनमध्ये 3,500 एमएएचची बॅटरी असून कनेक्टिव्हिटीसाठी ब्ल्यूटुथ, 3.5mm ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ, मायक्रो–युएसबी पोर्ट यांसारखे पर्याय आहेत.

Infinix Smart 3 Plus स्पेसिफिकेशन्स –
ड्युअल सिम असलेल्या इनफिनिक्स स्मार्ट 3 प्लसमध्ये 6.21 इंचाचा एचडी+ डिस्प्ले असून याचं रिझोल्युशन 720×1520 पिक्सल आणि आस्पेक्ट रेशो 19.5:9 आहे. वॉटरड्रॉप नॉच असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 2.5डी ग्लास प्रोटेक्शनचा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 2 गीगाहर्ट्ज हीलियो A22 क्वाड–कोर प्रोसेसरसह आयएमजी पावरवीआर जीपीयू आणि 2GB रॅम आहे. तसंच या फोनमध्ये 32GB इंटरनल स्टोरेज असून मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 2:29 pm

Web Title: infinix smart 3 plus first sale on flipkart
Next Stories
1 आता आला xiaomi चा ‘वायरलेस झाडू’ !
2 Samsung Launches Vertical Tv SERO: आडवा नाही तर चक्क उभा टीव्ही
3 Airtel : 48 आणि 98 रुपयांचे नवे रिचार्ज प्लॅन, मिळणार 6GB पर्यंत डेटा
Just Now!
X