18 January 2019

News Flash

इन्स्टाग्रामने युजर्ससाठी आणलं नवं फिचर

हे फिचर इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये अॅड करण्यात आलं आहे.

(संग्रहित छायाचित्र)

फेसबुकच्या मालकीची कंपनी इन्स्टाग्रामने युजर्ससाठी एक नवं फिचर अॅड केलं आहे. हे फिचर इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये अॅड करण्यात आलं आहे. हे एक शॉपिंग फिचर आहे. म्हणजे युजर्स आता इन्स्टाग्राम स्टोरीवरही शॉपिंग स्टिकर पाहू शकतात. इन्स्टाग्रामवर आता शॉपिंग बॅग आयकॉनचं स्टीकर दिसेल. इन्स्टाग्राम स्टोरिजसाठी शॉपिंग फिचर आणणार असल्याची घोषणा कंपनीने मंगळवारी केली होती.

सध्या Adidas, Aritzia आणि Louis Vuitton यांसारखे काही निवडक आंतरराष्ट्रीय ब्रॅंडच या फिचरमध्ये दिसतील. पण नंतर सर्वच ब्रॅंडचा समावेश करण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे. इन्स्टाग्रामच्या या फिचरची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मॅट्रिक्स लॅबच्या एका अहवालानंतर हे फिचर कंपनीने जारी केलं आहे. युजर्स इन्स्टाग्राम स्टोरीज पाहून ब्रॅंडची माहिती मिळवतात असं अहवालातून समोर आलं होतं.

या फिचरद्वारे इंस्टाग्राम युजर जगभरात आपल्या आवडीच्या ब्रॅंडच्या खरेदीबाबत सांगू शकतील. एखाद्या शॉपिंग स्टिकरवर टॅप करुन त्या प्रोडक्टबाबत युजर्स अधिक माहिती मिळवू शकतात. इन्स्टाग्रामने ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

First Published on June 14, 2018 3:05 pm

Web Title: instagram stories new feature will now let you buy products