अ‍ॅपल आयफोन्स (Apple iPhones) म्हणजे जगातील सर्वाधिक चर्चेत असणारे स्मार्टफोन्स. जगभरात आयफोनचे अनेक चाहते आहेत. आयफोनच्या अनेक मालिका आतापर्यंत लाँच झाल्यात…सध्या आयफोन 11 मालिका बाजारात आहे. पण तुम्हाला माहितीये का सर्वाधिक पॉप्युलर आयफोन कोणताय?

Counterpoint Research च्या रिपोर्टनुसार, आयफोन XR हा जगातील सर्वाधिक पॉप्युलर आयफोन आहे. यावर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये आयफोन XR कंपनीचा टॉप सेलिंग फोन ठरलाय. तर, 2018 च्या चौथ्या तिमाहीपासून हा फोन जगातील सर्वाधिक विक्री होणारा आयफोन ठरतोय असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

iPhone XR के स्पेसिफिकेशंस –
iPhone XR मध्ये 6.1 इंच एलसीडी डिस्प्ले असून यामध्ये ए12 बायॉनिक प्रोसेसर दिलं आहे. यामध्ये फेसआयडी, टच टू वेकअप, ड्युअल सिम, स्मार्ट एचडीआर, डेप्थ कंट्रोलसह पोर्ट्रेट मोड यांसारखे फीचर्स मिळतात. फोटोग्राफीसाठी 12 मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा आहे. आयफोन XR 64 जीबी, 128जीबी आणि 256 जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या पर्यायांसह उपलब्ध असून कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये एलटीई अ‍ॅडव्हांस, ड्युअल सिम आणि ब्लूटूथ 5.0 यांसारखे फीचर्स आहेत. व्हाइट, कोरल, ब्लॅक, ब्लू, येलो आणि रेड या सहा कलर्समध्ये हा आयफोन उपलब्ध आहे.