19 October 2019

News Flash

असा आहे iPhone XS आणि iPhone XS मॅक्स

दोन आठवडयांपूर्वी कॅलिफोर्नियात दिमाखदार सोहळयात अॅपलने लाँच केलेले iPhone XS आणि iPhone XS मॅक्स हे दोन्ही फोन विक्रीसाठी भारतात उपलब्ध झाले आहेत.

Apple Event 2018,Iphone Xr,Iphone Xs,Iphone Xs Max

दोन आठवडयांपूर्वी कॅलिफोर्नियात दिमाखदार सोहळयात अॅपलने लाँच केलेले iPhone XS आणि iPhone XS मॅक्स हे दोन्ही फोन विक्रीसाठी भारतात उपलब्ध झाले आहेत. अॅपलचे हे दोन्ही फोन लाँच झाल्यापासून चर्चेत आहेत. iPhone XS हा iPhone X चे पुढचे अपग्रेडेड व्हर्जन आहे तर iPhone XS मॅक्स हा iPhone XS पेक्षा एक पाऊल पुढे आहे.

अॅपलच्या दोन्ही लेटेस्ट iPhone मध्ये ओएलईडी डिस्पले आहे. या दोन्ही नव्या आयफोनमध्ये A12 बायोनिक चिप देण्यात आली आहे. त्यामुळे Animoji, फोटोज आणि पोट्रेट मोडमध्ये अमुलाग्र बदल करू शकतो. अॅपलच्या दोन्ही फोनमध्ये अनेक नवीन फिचर्स आहेत.

iPhone XS – ५.८ इंच OLED डिस्पले, २४३६ X ११२५ पिक्सल रेसोल्युशन, A12 बायोनिक चीपसेट, ६४ जीबी/ 256जीबी/ 512 जीबी स्टोअरेज क्षमता आहे. १२ एमपी+१२एमपी रेअर कॅमरा, आयओएस १२
iPhone XS ६४ जीबीच्या भारतातील फोनची किंमत ९९,९०० रुपये आहे.

iPhone XS मॅक्स ६४ जीबीच्या भारतातील फोनची किंमत १ लाख ९ हजार ९०० रुपये आहे.

iPhone XS तुम्ही जुन्या iPhone X च्या शेजारी ठेवला तर तो तितका नवीन, ओरिजनल वाटणार नाही. अॅपलने फोनचा लूक, रंगावर जास्त मेहनत घेतलीय. साईडला स्टेनलेस स्टील फ्रेम आणि सोनेरी रंगाची कडा आहे. iPhone XS तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन ५ एस पासून अॅपलने सोनेरी रंगाचा वापर सुरु केला. नव्या iPhone XS मध्ये व्हिडिओ पाहताना एक वेगळा आनंद मिळतो.

अॅपलच्या दोन्ही iPhone XS आणि iPhone XS मॅक्स या दोन्ही फोनचा वेग प्रचंड असून कॅमेरा तंत्रज्ञानातही लक्षणीय प्रगती केली आहे.  A12 बायोनिक चीपमुळे हा वेग वाढला आहे तसेच या दोन्ही फोनमध्ये डयुअल सीमची सोय आहे.  iPhone Xs आणि iPhone Xs Max हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान आयफोन असल्याचा दावा कंपनीने लाँचच्यावेळी केला होता. हे आयफोन पहिल्या आयफोनपेक्षा ३० टक्के अधिक वेगवान आहेत असे कंपनीने लाँचच्यावेळी सांगितले होते आता हे फोन वापरणाऱ्यांनाही तसाच अनुभव येत आहे.

First Published on September 28, 2018 6:32 pm

Web Title: iphone xs iphone xs review