‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ अर्थात आयआरसीटीसीने अलिकडेच आपली वेबसाइट अपडेट करुन रीलाँच केली होती. तसेच, Rail Connect अ‍ॅपमध्येही नवीन इंटरफेस आणि फिचर्ससह बदल केला होता. त्यानंतर आता आयआरसीटीसीने एक नवीन पेमेंट गेटवे IRCTC-iPay सेवा लाँच केली आहे.

IRCTC-iPay द्वारे प्रवाशांना बूक केलेल्या तिकिटासाठी पेमेंट करणं सहजसोपं होणार आहे. IRCTC-iPay द्वारे पेमेंट करण्यासाठी युजर्सना आपल्या UPI बँक अकाउंटच्या डेबिट कार्ड किंवा अन्य एखाद्या पेमेंट फॉर्मचा वापर करण्याची परवानगी आणि अन्य डिटेल्स द्यावी लागतील. याद्वारे प्रवासी काही सेकंदांमध्येच ट्रेनचं तिकीट बूक करु शकणार आहेत. एकदा दिलेली माहिती भविष्यातील ऑनलाइन व्यवहारांसाठीही वापरता येईल. यासोबतच IRCTC वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे तिकिट बूक केल्यानंतर IRCTC iPay द्वारे इंस्टंट रिफंड देखील मिळेल. नवीन पेमेंट गेटवेमुळे युजर्सचा टाइमही वाचेल.

याशिवाय, गेल्या आठवड्यात IRCTC ने प्रवाशांसाठी बस तिकीटाची सेवाही सुरू केली आहे. त्यामुळे आता आयआरसीटीसीच्या मदतीने प्रवासी ट्रेन आणि विमानाशिवाय आता बस तिकिटही बूक करु शकतात. ही सेवा 29 जानेवारीपासून सुरू झाली आहे.