टेलिकॉम सेक्टर हादरवून टाकल्यानंतर रिलायन्स आता गुगलला टक्कर देणार आहे. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्सने स्वदेशी ब्राउजर लाँच केले आहे. हा ब्राऊझर भारतीय ग्राहकांच्या गरजा ध्यानात घेऊन तयार करण्यात आला आहे. तसेच हा पहिला भारतीय वेब ब्राऊझर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. रिलायन्स जिओने या ब्राउजरला नाव “JioBrowser” असे दिले आहे.

इतर ब्राऊझर्सच्या तुलनेत हा“JioBrowser” अतिशय वेगवान आहे. या सोबतच जिओब्राऊझर वापरण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि योग्य रितीने काम करण्यासाठी याला अधिक मेमरी स्टोरेजचीही आवश्यकताही नाही. सध्या हा ब्राऊझर अँड्रॉइड वापरकर्त्यांनाच वापरता येणार आहे. पण Apple iOSसाठी उपलब्ध नाही. स्वदेशी जिओ ब्राउजर गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करता येणार आहे, आतापर्यंत १० लाख जणांनी डाऊनलोड केले आहे.

काय आहे ब्राउजरमध्ये –
– व्हिडिओ आणि ताज्या बातम्यांचा खजिना
– स्थानिक बातम्यांचा वेगळा सेक्शन करू शकता
– ८ भारतीय भाषांना सपोर्ट करणार.
– ज्यात मराठी,हिंदी, गुजराती, तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषांचा समावेश आहे.
– एखाद्या वेबसाईटवर सरळ जाता येईल
– मित्रांसोबत व्हिडीओ आणि फोटो शेअर करू शकता.
– हिस्ट्री पेजवर जाऊन आपल्या डाऊनलोड फाइल्सचे नियंत्रण करता येणार