17 January 2021

News Flash

JioFiber युजर्ससाठी खास प्लॅन, फ्री मिळणार Lionsgate Play चा अ‍ॅक्सेस

जिओ युजर्सना वेगळं अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज नाही...

रिलायन्स जिओने आपल्या Jiofiber युजर्ससाठी खास ऑफर आणली आहे. याअंतर्गत जिओ फाइबरचे युजर्स जिओ सेट-टॉप बॉक्‍सवर लायन्सगेट प्लेसोबत (Lionsgate Play ) हॉलिवूडचे ब्‍लॉकबस्‍टर सिनेमे मोफत बघू शकतील.

हॉलिवूडमधील लोकप्रिय सिनेमांसाठी ‘लायन्सगेट प्ले’ हा सध्या एक चांगला पर्याय ठरत आहे. लायन्सगेट प्लेच्या सर्व्हिससाठी जिओ युजर्सना वेगळं अ‍ॅप डाउनलोड करावं लागणार नाही. युजर्सना JioTV+ द्वारे जिओ सेट-टॉप बॉक्‍सवर या सेवेचा लाभ घेता येईल. ऑफरनुसार, जिओ फाइबरचे युजर्स लायन्सगेट प्लेवरील सर्व प्रीमियम कंटेंट कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बघू शकणार आहेत. पण सिल्वर किंवा त्यावरच्या प्लॅन असलेल्या ग्राहकांना ही सेवा मोफत मिळेल. याशिवाय नवीन युजर्सनाही ही ऑफर मिळेल.या प्लॅटफॉर्मवर 7,500 पेक्षा जास्त प्रीमियम टीव्ही सीरिज, सिनेमे आणि अन्य लोकप्रिय कार्यक्रम आहेत.

देशात सध्या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार, झी5, ऑल्टबालाजी असे विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्स आघाडीवर आहेत. तर, लायन्सगेट प्ले हा प्लॅटफॉर्म हॉलिवूड सिनेमांसाठी पुढे येत असून भारतात विस्तारासाठी कंपनीने आता जिओसोबत हातमिळवणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 3:47 pm

Web Title: jiofiber users to get access to lionsgate hollywood content in multiple languages sas 89
Next Stories
1 2000 रुपयांनी स्वस्त झाला Xiaomi चा फोन, फक्त पाच दिवसांसाठी ऑफर
2 कपड्यांच्या आतमध्ये फिट होतो Sony चा नवा AC, गरमीपासून मिळेल दिलासा
3 ‘गाता रहे मेरा दिल’ ऑनलाइन गायन स्पर्धेचं आयोजन
Just Now!
X