20 January 2021

News Flash

वजन घटवण्यासाठी करिना वापरते ‘हा’ फंडा !

करिनासारखी साईज झिरो फिगर असावी असा हट्ट अनेकींनी धरला. मात्र करिनानं तिचा योग्य पद्धतीनं वजन घटवण्याचा फंडा शेअर केला आहे.

करिना कपूर

काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘टशन’ चित्रपटासाठी अभिनेत्री करिना कपूरनं खूपच वजन घटवलं होतं. तिची साईज झिरो फिगर चर्चेचा विषय ठरली होती. खरं तर यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिकाही झाली होती. त्यावेळी करिनासारखी साईज झिरो फिगर असावी असा हट्ट अनेकींनी धरला. अनेकजणी वजन घटवण्यासाठी उपाशी राहू लागल्या मात्र यामुळे वजन कमी होण्याऐवजी अशक्तपणामुळे त्या आजारी पडण्याचं प्रमाण अधिक वाढलं. पण करिना मात्र अशाप्रकारच्या कोणत्याही गोष्टीचं समर्थन करत नाही.

मी अनेकदा चित्रपटासाठी वजन घटवलं आहे पण, ते वजन मी योग्यपद्धतीनं घटवलं असं करिना म्हणते. तैमूर झाल्यानंतरही करिनानं वजन घटवलं त्यामुळे करिनाचा फिटनेस आणि वजन घटवण्याचा फंडा जाणून घेण्याचं कुतूहल तिच्या महिला चाहत्यांनादेखील आहे. अशा चाहत्यांशी करिनानं तिचा वजन घटवण्याचा फंडा शेअर केला आहे. वजन घटवण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपासमार मी केलेली नाही अत्यंत योग्य पद्धतीनं आणि सल्ला घेऊनच मी वजन घटवलं असं करिनानं स्पष्ट केलं आहे.

माझ्या आहारात दुधी, कारल्याची भाजी एक चपाती आणि एक वाटी भात अशा पदार्थांचा समावेश आवर्जून असतो. तर रात्रीच्या जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सूप्सचा समावेश आहारात असतो असंही ती म्हणाली. वजन घटवण्यासाठी स्वत:चं मन मारून आवडत्या पदार्थांकडे दुर्लक्ष करणं मला आवडत नाही त्यामुळे मी अगदी खूप तूप आणि पराठेदेखील खाते. जे शरीरास पोषक आहेत त्या प्रत्येक पदार्थांचा आहारात आवर्जून सहभाग असावा, नियमित व्यायमही तितकाच गरजेचा आहे. त्यामुळे आहारात योग्य संतुलन राखत योग्य पद्धतीनंचं वजन घटवा असा सल्ला बेबोनं दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 10:49 am

Web Title: kareena kapoor khan on her weight loss fitness funda
Next Stories
1 प्रियांका म्हणते, यापुढे मी तडजोड करणार नाही!
2 महेश बाबूने वाढदिवशी दिली चाहत्यांना खास भेट
3 ‘तख्त’साठी लढणार रणवीर- विकी; करण जोहरने केली बिग बजेट चित्रपटाची घोषणा
Just Now!
X