News Flash

Seltos ची ग्राहकांना भुरळ , लाँचिंगपूर्वीच बुकिंग 23 हजारांपार

देशभरात एकूण 265 टचपॉइंट्स

दक्षिण कोरियाची ख्यातनाम कार निर्माती कंपनी Kia Motors ने भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात शानदार पदार्पण केलं असून त्यांची बहुचर्चित Seltos एसयूव्ही 22 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार आहे. पण लाँचिंगआधीच या कारची ग्राहकांना भुरळ पडल्याचं दिसतंय. कारण अद्याप ही कार लाँच देखील झालेली नाही पण आतापर्यंत तब्बल 23 हजार जणांनी या कारसाठी बुकिंग केली आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी 16 जुलैपासून 25 हजार रुपयांमध्ये बुकिंग सुरू झालं होतं. ह्युंडई व्हेन्यू आणि एमजी हेक्टर प्रमाणेच ही देखील अनेक आकर्षक फीचर्स असलेली एक कनेक्टेड कार असून बरीच चर्चेत आहे.

कंपनीचे देशभरात एकूण 265 टचपॉइंट्स असतील, याद्वारे देशात सर्वत्र ही कार विक्रीसाठी उपलब्ध असेल. ‘किआ मोटर्स’च्या या एसयूव्हीमध्ये इंजिनसाठी तीन पर्याय असतील. यातील एक 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल, दूसरं 1.5-लिटर पेट्रोल आणि तिसरं 1.5-लिटर डिझेल इंजिन असेल. सर्व इंजिन ‘भारत स्टेज 6’ (बीएस 6) मानकांनुसार असतील. 1.5-लिटरच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन स्टँडर्ड असून दोन्ही इंजिनमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनसह 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रांसमिशनचा पर्याय आहे.

कनेक्टेड कार –
ही कनेक्टेड कार आहे. यामध्ये UVO Connect नावाची एक कनेक्टिव्हिटी सिस्टिम आहे. यात नेव्हिगेशन, सेफ्टी-सिक्युरिटी, व्हेइकल मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल आणि कनव्हिनियन्स या 5 श्रेणीअंतर्गत 37 फीचर्स देण्यात आलेत. अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार-प्ले आणि नेव्हिगेशनसह 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, एअर प्यूरिफायरसाठी रिमोट कंट्रोल, रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप, व्हेइकल ट्रॅकिंग, व्हॉइस कमांड, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, 360 डिग्री सराउंड कॅमेरा, 6-एअरबॅग, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट व रिअर पार्किंग सेंसर्स आणि ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर यांसारखे फीचर्स आहेत. 10 ते 16 लाख रुपयांच्या दरम्यान या कारची किंमत असू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2019 5:05 pm

Web Title: kia motors seltos suv over 23000 bookings before launch sas 89
Next Stories
1 Honda CB300R च्या किंमतीत बदल, पहिल्या तीन महिन्यांतच झाली होती ‘सोल्ड आउट’
2 Benelli Leoncino 500 भारतात लाँच, 10 हजारांत बुकिंग सुरू
3 Hyundai ची नवीन Grand i10 Nios, केवळ 11 हजार रुपयांत करा बुकिंग
Just Now!
X