09 March 2021

News Flash

जाणून घ्या बँक कसा मोजते आपला मासिक सरासरी बॅलन्स

एका बँक खात्याच्या व्यवस्थापनासाठी बँकेलाही काही खर्च येतो. म्हणूनच खात्यात किमान शिल्लक म्हणजेच बॅलन्स ठेवणे आवश्यक असते.

प्रातिनिधिक छायाचित्र

बॅंक खाते असणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असून मोदी सरकारने केलेल्या विविध योजनांसाठी तर बँक खाती उघणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता आपले बँक खाते असते आपण त्यामार्फत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अनेक व्यवहार नियमित स्तरावर करत असतो. पण बँक आपले हे खाते कशापद्धतीने ऑपरेट करते याबाबत आपल्याला पुरेशी माहिती असेलच असे नाही. तर एका बँक खात्याच्या व्यवस्थापनासाठी बँकेलाही काही खर्च येतो. म्हणूनच खात्यात किमान शिल्लक म्हणजेच बॅलन्स ठेवणे आवश्यक असते. तसे न केल्यास बँका त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू राहावेत यासाठी तुमच्याकडून दंड आकारतात.

जर तुमचे पगार-खाते असले किंवा बेसिक बचत बँक ठेव खाते असले तर बँका तुम्हाला शून्य बॅलन्सची सोय देतात. अशा खात्यांसोबत तुम्हाला फार कमी सोयी मिळतात आणि म्हणूनच त्यात किमान बॅलन्स ठेवण्याची गरज नसते. सामान्य बचत खात्यामध्ये मात्र व्याज परतावा आणि दंडाची गणना करण्यासाठी मासिक किमान बॅलन्स पाहिला जातो. पाहूया मासिक सरासरी बॅलन्सची (एमएबी) गणना कशी केली जाते.

एमएबीची गणना कशी केली जाते

एमएबीची गणना त्या विशिष्ट महिन्यातील एकूण दिवसांच्या संख्येने प्रत्येक दिवसाच्या क्लोजिंग बॅलन्सच्या बेरजेला भागून केली जाते. साधारणपणे बँकांनी ठरवलेला एमएबीचा आकडा महानगरी, नागरी, अर्ध-नागरी आणि ग्रामीण भागांतील शाखांनुसार वेगवेगळा असू शकतो आणि रेग्युलर सेव्हिंग खात्यासाठी १ हजार ते १० हजारपर्यंत असू शकतो.

एमएबीची अट सहज पूर्ण करण्याचे मार्ग

1) अनेक बँक खाती ठेवू नका, कारण प्रत्येक बँकेची एमएबीची अट निराळी असते आणि त्यावर लक्ष ठेवणे कठीण असते. तसेच या खात्यांमध्ये एमएबीची अट पूर्ण करताना तुमचा बराचसा पैसा अडकून पडू शकतो.

2) थोड्या हुशारीने तुम्ही सहज एमएबीची अट पूर्ण करू शकता. समजा तुमची एमएबीची गरज ५ हजार रुपये आहे, तर तुम्ही एकतर रोज तेवढा क्लोजिंग बॅलेंस ठेवू शकता किंवा महिन्यातून एक दिवस १,५०,००० इतका क्लोजिंग बॅलन्स ठेवू शकता. या दोन्हीचा अर्थ एकच होतो.

3) खाजगी क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एमएबीची आवश्यकता कमी आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये खाते उघडल्याने तुमच्यावरील भार कमी होईल.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 10:45 am

Web Title: know how bank calculate our monthly average balance
Next Stories
1 कोंबडी व टर्कीच्या मांसामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग
2 कर्ज हवंय? गुगलही करणार आता मदत
3 Realme 2 भारतात लॉन्च, कमी किंमतीत मिळणार फुल एचडी नॉच डिस्प्ले
Just Now!
X