क्रेडिट कार्डांनी आपल्या खिशामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे; याचं कारण केवळ सोयच नाही तर त्यांच्याशी निगडीत कॅशबॅक, रिवॉर्ड पॉईंट्स आणि सवलती हे सुद्धा आहे. उपभोक्त्यांच्या बदलत्या गरजा आणि सातत्याने विकसित होत असलेली आर्थिक इको-सिस्टम यामुळे बाजारात नवीन प्रकारचे क्रेडिट कार्ड आलेले दिसत आहेत. सरासरी क्रेडिट कार्ड वापरकर्त्याला दोन प्रकारची कार्डे मिळू शकतात. त्यांचे व्हॅनिला कार्ड आणि को-ब्रँडेड कार्ड असे प्रकार पडतात. नेहमीच्या क्रेडिट कार्डामध्ये सर्व व्यवहाराला एकसमान लाभ मिळतात, तर को-ब्रँडेड क्रेडिट कार्डावर काही विशिष्ट व्यापाऱ्यांकडे अतिरिक्त लाभ मिळतात. ज्यांच्या खर्चाच्या विशिष्ट सवयी आहेत आणि जे ब्रँडला प्राधान्य देतात, त्यांच्यासाठी को-ब्रँडेड क्रेडिट कार्डे एक चांगला पर्याय आहे.

को-ब्रँडेड कार्डे काय आहेत?

को-ब्रँडेड कार्डे बँका/वित्तीय संस्था आणि किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्या किंवा व्यापारी एकत्रितपणे देऊ करतात आणि यांचा मार्ग क्रेडिट कार्ड कंपन्यांद्वारे असतो. उदाहरणार्थ, एअरलाईन कंपन्या आणि बँकांद्वारे देऊ केली जात असलेली हाय फ्लायर कार्डे; संबंधित व्यवसायांमध्ये या कार्डांद्वारे हवाई तिकिटे आरक्षित केल्यास सूट आणि अतिरिक्त रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात.
या कार्डांचा वारंवार वापर केल्यास सूट आणि अपग्रेड्स मिळतात, तेव्हा जर तुम्ही एखाद्या स्टोअर/ब्रँडचे निष्ठावंत ग्राहक असाल तर को-ब्रँडेड कार्डे निवडा.

को-ब्रँडेड क्रेडिट कार्डाचे लाभ

संबंधित व्यापारी किंवा दुकानांमध्ये विशिष्ट कार्डांद्वारे वारंवार खरेदी केल्यास को-ब्रँडेड क्रेडिट कार्डे घसघसशीत फायदा देतात. तेव्हा, इंधनाच्या किमती आकाशाला भिडलेल्या असतात तेव्हा जर तुमच्याकडे इंधन खरेदीवर आकर्षक रिवॉर्ड पॉईंट्स आणि सूट देणारे को-ब्रँडेड कार्ड असेल तर तुम्ही दीर्घावधीमध्ये चांगले पैसे वाचवू शकता. तुम्ही वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी हे रिवॉर्ड पॉईंट्स रिडीम करू शकता. ही कार्डे तुम्हाला ईएमआयवर खरेदीचा पर्याय देतात, तसेच कमी व्याज दर, प्रक्रिया शुल्कावर सूट इत्यादी फायदेही देतात.

को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड कोणी घ्यावे?

तुमची खरेदी जर एकाच ब्रँडपुरती मर्यादित नसेल तर, नेहमीच्या क्रेडिट कार्डाच्या तुलनेत को-ब्रँडेड क्रेडिट कार्डे तुम्हाला फार काही वेगळे देऊ शकणार नाहीत. दुसरीकडे, जर तुमची एखाद्या विशिष्ट ब्रँडवर निष्ठा असेल तर, इतर ग्राहकांनी दिलेले सेल रिव्ह्यू, रिवॉर्ड पॉईंट मल्टिप्लायर आणि सूट या गोष्टींचा तुम्हाला फायदा मिळू शकतो. व्यावसायिक भागीदाराचे हित विचारात घेऊन रिवॉर्ड पॉईंटची रचना केलेली असते. या कार्डांसाठी प्रवेश शुल्क आणि वार्षिक शुल्क असू शकते. त्यामुळे, तुम्हाला या कार्डांतून मिळणारे फायदे हे त्यांच्यासाठी केलेल्या खर्चाहून जास्त असतील याची तुम्ही खात्री केली पाहिजे.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

कधीकधी तुमची सर्व खरेदी एकाच क्रेडिट कार्डावर होऊ शकणार नाही. अशावेळी, जास्त लाभ मिळवण्यासाठी तुम्ही अनेक को-ब्रँडेड कार्डांसाठी अर्ज केला पाहिजे. तथापि, जेव्हा तुमच्याकडे अनेक कार्डे असतात तेव्हा तुम्ही त्यांच्या वापराबाबत काळजी घेतली पाहिजे. केवळ कार्डांवर ऑफर आहेत आणि वारंवार वापरल्यामुळे तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील म्हणून तुमच्या हातून जास्त खर्च होणार नाही याची काळजी घ्या. ब्रँडच्या निष्ठेतून अयोग्य खर्च होऊ नये म्हणून कार्ड घेण्यापूर्वी नियम आणि अटींबाबत बारीक अक्षरात छापलेली माहिती नीट वाचून माहिती करून घ्या.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार