प्रत्येक महिला आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी अहोरात्र झटत असते. घरातील प्रत्येक जबाबदारी ती लिलया पार पाडत असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ती कायम प्रयत्नशील असते. मात्र अनेकवेळा इतरांच्या गरजांकडे लक्ष देत असताना ती स्वत:च्या गरजांकडे कायम दुर्लक्ष करे. यात बहुतेकवेळा तिच्या आरोग्याकडेही ती दुर्लक्ष करताना दिसते. मात्र स्त्रियांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. घरातील स्त्री आनंदी व स्वस्थ असेल, तर कुटुंब देखील आनंदी व आरोग्यदायी राहतं. त्यामुळे महिलांनी दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढून या वेळात योग, व्यायाम किंवा आवडत्या कामात मन रमवलं पाहिजे. यातच ‘द योगा इन्स्टिट्यूट’च्या संचालिका डॉ. हंसाजी जयदेव योगेंद्र यांनी गृहिणींसाठी घरच्या घरी करता येणारी काही योगासने सांगितली आहेत.

१.यास्तिकासन –
यास्तिकासन केल्यामुळे शरीरातील सर्व स्नायू ताणले जातात. यात स्नायूंमधील ऊती, तसेच अवयव ताणले जाऊन रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे हे आसन महिलांसाठी फायदेशीर आहे. हे आसन करताना प्रथम पाठीवर झोपा व पाय एकमेकांना जोडून घ्या. त्यानंतर श्वास घेत हात डोक्याच्या बाजूने वर घ्या आणि हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. ज्यामुळे शरीरातील स्नायू ताणले जातील.श्वासोच्छवास करत ५ ते ६ सेकंदांपर्यंत याच स्थितीमध्ये राहा आणि त्यानंतर पुन्हा मूळ स्थितीमध्ये या.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?

२. भुजंगासन –
हे मागच्या बाजूने वळत करण्याचे आसन आहे. या आसनामुळे तणाव व थकवा दूर होतो. घरातील काम केल्यानंतर होणाऱ्या पाठदुखीवर भुजंगासन हा रामबाण उपाय आहे. या आसनामुळे पाठीला आराम मिळतो. पोटाच्या बाजूने जमिनीवर झोपा आणि हात जमिनीवर ठेवा. हात कोप-यामध्ये वाकवत छातीच्या बाजूला जमिनीला स्पर्श करत ठेवा. श्वास घेत शरीराचा डोके व मानेपर्यंतचा भाग कमरेपर्यंत वर उचलत वरच्या दिशेने पाहा आणि हे करत असताना पाय एकमेकांना जुळवून ठेवा. ६ सेकंदांपर्यंत या स्थितीमध्ये राहा आणि त्यानंतर हळूहळू मूळ स्थितीमध्ये या.

३. सर्वांगासन-
दिवसभर उभं राहून कामं केल्यामुळे शरीराचा संपूर्ण भार पायांवर येतो.त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी हा योगप्रकार फायदेशीर आहे. तसंच या आसनामुळे मन देखील स्थिर होते. हे आसन करण्यासाठी प्रथम पाय एकमेकांना जुळवत हात बाजूने ताठ ठेवत पाठीच्या बाजूने झोपा. गुडघे, पाय कमरेच्या भागापर्यंत वाकवा. हाताच्या साहाय्याने कमरेचा भाग धरा आणि श्वास सोडत पाय वरच्या बाजूने उचला. असे करत असताना गुडघे वाकलेल्या स्थितीत म्हणजेच कोनाच्या आकाराप्रमाणे ठेवा. हळूहळू पाय सरळ करा आणि पायाची बोटे वरच्या बाजूने धरा. गुडघा देखील सरळ ठेवा. पाठीच्या कणाला आधार देण्यासाठी हाताचा वापर करा. हनुवटी व तोंडाचा भाग जमीन समांतर सरळ ठेवा. ही स्थिती १० ते १२ सेकंदांपर्यंत ठेवा आणि विरुद्ध क्रिया करत हळूहळू मूळ स्थितीमध्ये या.