डॉ. आनंद कवी

बऱ्याच वेळा उतरत्या वयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक तक्रारी जाणवू लागतात. यामध्ये कंबरदुखी आणि पायात वेदना होणे, पायाला सतत मुंग्या येणे किंवा पाय जडपणे अशा समस्या निर्माण होऊ लागतात. परंतु, अनेकदा वयोमानानुसार या तक्रारी होत असतील असं म्हणून काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, ही सारी लक्षणं लंबर कॅनॉल स्टीनोसिसची आहेत. हे अनेकांना माहित नसतं. त्यामुळेच लंबर कॅनॉल स्टीनोसिस म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात.  साध्या सोप्या शब्दात सांगायचे तर लंबर कॅनाल स्टीनोसिस म्हणजे पाठीच्या कण्यातील जागा अरुंद होणे आणि त्यातून जाणारा मज्जारज्जू आणि मज्जातंतू दाबला जाणे. या आजाराची लक्षणे वयाच्या ५० व्या वर्षापासूनच दिसू लागतात व वयाबरोबर हा त्रासदेखील वाढू लागतो.

Mukta Barve danced with Laxmikant berde in the film Khatyal Sasu Nathal Sun
लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती मुक्ता बर्वे, अवघ्या चार वर्षांची असताना झळकली होती ‘या’ लोकप्रिय चित्रपटात
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
ऑस्टियोपोरोसिस म्हणजे काय? कारणे ,लक्षणे आणि उपाय
Gold Silver Price on 12 April 2024
Gold-Silver Price on 13 April 2024: सोन्याचा भाव ऐकून बाजारात उडाली खळबळ; जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत

लंबर कॅनॉल स्टीनोसिस म्हणजे नेमकं काय ?

पाठीचा कण्याची मूळरचना ही एखादया कॅनल किंवा नळीसारखी असते, ज्यात मज्जातंतू सुरिक्षत राहून मेंदूचे संकेत संपूर्ण शरीरात पोहोचवतात. पाठीचा कणा हा मणक्यांचा हाडांच्या मालिकेद्वारे बनलेला असतो. या मालिकेचा प्रत्येक भाग हा दोन मणके आणि त्यामधील धक्का शोषक चकती (डिस्क) ने तयार झालेला आहे . जीर्णत्वामुळे ही चकती उसवते ( स्लीप डिस्क ) व त्याच बरोबर दोन हाडांमधील अंतर कमी होते. यामुळे पाठीच्या कण्याच्या आतील जागा अरुंद होते आणि मज्जातंतू सूज येते. परिणामी मेंदूकडून होणा-या संकेतांचा ( सिग्नल्स) प्रवाह विस्कळीत होतो.

लंबर कॅनॉल स्टीनोसिस लक्षणे –
१.पायात बधिरता जाणवणे किंवा मुंग्या येणे.

२.तळव्यांची जळजळ होणे.

३. पोट-या व पावले जड वाटणे.

४. कंबरेत व पायात वेदना होणे .

५. पोटरीत गोळे येणे.

६. पायात गोळे आल्याने झोपमोड होणे.

७. पावलात व पायात सुया टोचल्या सारखे वाटणे.

९. कंबरेत दुखणे किं वा जळजळणे.

१०. चालणे अवघड होणे.

११. पायातली ताकद कमी वाटणे.

उपचारपद्धती –
रुग्णाची शास्रोक्त पद्धतीने तपासणी केल्यानंतर लागल्यास एमआरआय स्कॅन केला जातो . तपासणीअंती कण्यात कुठल्या दोन मणक्यांत जागा खूप कमी झाली आहे व मज्जातंतू वरील दबावाचे ( कम्प्रेशन ) प्रमाण हे निश्चित केले जाते.

आजाराच्या प्रारंभिक अवस्थेत मज्जातंतूंची सूज कमी करून त्यांचे काम नियिमत चालू राहील व वेदना कमी होतील अशी औषधे दिली जातात. रुग्णाचे शारीरिक वजन, बसण्या उठण्याची पद्धत, आहार आणि जीवन शैली या वर मार्गदर्शन केले जाते. व्यायाम प्रकार व फिजओथेरपीद्वारे ताकद वाढिवणे आणि वेदना कमी करणे यासाठी उपचार केले जातात.

मध्यम ते तीव्र दबावाच्या ( कम्प्रेशन) अवस्थेत मज्जातंतूंची सूज कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी पाठीचा कण्यात ( स्पायनल इंजेक्शन ) विशिष्ट ठिकाणी स्पेशल इंजेक्शनद्वारे औषध दिले जाते.

तीव्र ते अति तीव्र दबाव असल्यास शस्त्रिक्रयेद्वारे मेरुदंडाचे हाड तासून कण्याचा आतील जागा वाढवून मज्जातंतूंवरील दबाव कमी केला जातो आणि वेदनादायक भागाची हालचाल थांबिवण्याकिरता काहींमध्ये मेटल इम्प्लांट्ससह दोन मणक्यांची जोडणी करावी लागते.

अधुनिक उपचार –

वाढत्या वयाबरोबर उच्च रक्तदाब, मधुमेह,लठ्ठपणा, हृदय, फुफ्फुस आणि मूत्रिपंडाच्या व्याधी या समस्यादेखील असतात. ज्यामुळे मोठी शस्त्रक्रिया करणे आणि भूल देणे कठीण असते. तसेच हाडांच्या ठिसूळतेमुळे एकापेक्षा जास्त ठिकाणी दबाव असल्यास पारंपरिक शस्त्रक्रिया करणे अवघड असते. या अडचणींवर मात करण्यासाठी, मणक्याची शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ( इंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी ) आधुनिक पद्धतीने केली जाते.

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचे फायदे :

१. वयामुळे मुळातच कमकुवत झालेल्या पाठीच्या कण्याच्या संरचनेला धक्का न पोहोचवता छोट्या छिद्राद्वारे शस्त्रक्रिया केली जाते.

२. दुर्बिणीमुळे दबलेले मज्जातंतू स्पष्ट व विस्तीर्ण ( मॅग्नीफाईड) दिसतात.

३. डायमंड बर ,रेडीओफ्रिक्वेनसी प्रोब, लेसर या सारखी सूक्ष्म व अत्याधनिक साधने वापरली जातात.

४. वरील साधनांमुळे ही शस्त्रिक्रया संपूर्ण भूल न देता जागृत अवस्थेत करणे शक्य होते, यामुळे मज्जातंतूंची हानी टळते व भुलेची जोखीम कमी होते व शस्त्रक्रिया अपूर्ण रहाणे किंवा चुकीच्या ठिकणी होणे असे समभाव्य धोके टळतात.

५. अचूक व सुरिक्षत शस्त्रक्रिया झाल्याने रुग्ण त्वरित बरा होऊन १ ते २ दिवसांत घरी जातो.

६. जंतुसंसर्ग व रक्तस्त्राव होण्याचा धोका कमी असल्याने रक्त देणे किंवा दिघर्काळ शिरेतून औषध देणे टळते.

७.आयसीयु, स्पेशलाईज फिजीओथेरपी, ड्रेसिंग हे सोपस्कार टाळतात तसेच हॉस्पिटलचा मुक्काम कमी झाल्याने शस्त्रक्रिया अत्याधुनिक असूनही वाजवी दरात होते.

(लेखक डॉ. आनंद कवी, हे पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल येथे इंडोस्कोपिक Spine सर्जन आहेत.)