देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने भारतीय बाजारात आपली लोकप्रिय एसयूव्ही Mahindra Thar च्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलला काही दिवसांपूर्वी सादर केले होते. तेव्हापासून ही गाडी बरीच चर्चेत आहे. कंपनी ही बहुप्रतिक्षित एसयूव्ही 2 ऑक्टोबर रोजी लाँच करणार आहे. 2 ऑक्टोबरपासूनच या ऑफ-रोड एसयूव्हीच्या बूकिंगलाही सुरूवात होईल.

इंजिन :-

नवीन Mahindra Thar ही एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल दोन इंजिन पर्यायांमध्ये येईल. थारच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये कंपनीने 2.0-लिटर क्षमतेच्या ‘mStallion’ टर्बो पेट्रोल इंजिनचा वापर केलाय. तर, डिझेल व्हर्जनमध्ये 2.2-लिटर क्षमतेच्या पारंपरिक mHawk डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 132hp ची पॉवर आणि 300Nm टॉर्क निर्माण करतं. तर, पेट्रोल इंजिन 187 bhp पॉवर आणि 380Nm टॉर्क निर्माण करतं. दोन्ही इंजिनसोबत 6-स्‍पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्‍सचा पर्याय मिळेल.

फीचर्स :-

या ऑफ-रोडर एसयूव्हीमध्ये सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग, ABS, EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टिम, हील होल्ड असिस्ट, हील डीसेंट कंट्रोल यांसारखे फीचर्स आहेत. जुन्या थारच्या तुलनेत या एसयूव्हीच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत. नवीन थारमध्ये सर्कूलर हेडलाइट्ससोबत 7 स्लॉट ग्रिल, चंकी व्हील्स आणि बॉक्सी टेल लाइट आहे. नवीन थारमध्ये आधीच्या तुलनेत जास्त कॉम्पॅक्ट ग्रिलचा वापर करण्यात आला आहे. कारमध्ये नवीन अ‍ॅलॉय व्हील्स, रिडिझाइन टेल लाइट्स आणि नवीन रिअर बंपर देण्यात आले आहे. शिवाय आता कारच्या मागील बाजूला फ्रंट फेसिंग सीट्स देण्यात आले आहेत. आधीच्या थारमध्ये रिअर साइड फेसिंग सीट्स होते. नवीन थार AX आणि LX अशा दोन व्हेरिअंटमध्ये आणि सहा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.

किंमत किती ?

कंपनीने अद्याप या कारच्या किंमतीबाबत घोषणा केलेली नाही. 2 ऑक्टोबर रोजी, लाँचिंगच्या दिवशीच नवीन थारच्या किंमतीचाही खुलासा केला जाणार आहे. पण, जवळपास 12 ते 15 लाख रुपये इतकी या एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.