दोन किंवा जास्त महिला एकत्र आल्यावर त्या काय करतील सांगता येत नाही. त्या एकमेकांशी गप्पा मारल्याशिवाय शांतच बसू शकत नाहीत. त्यामुळे पुरुष आणि महिलांचा विचार केला तर महिला सर्वाधिक प्रमाणात गॉसिप करतात असे म्हटले जाते. एकमेकांविषयी चुगल्या करणे, फॅशन, रेसिपी किंवा जगातील कोणत्याही गोष्टींविषयी त्या वाटेल तितका वेळ बोलू शकतात असे जगात सर्वत्र म्हटले जाते. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात पुरुषही महिलांपेक्षा कमी गॉसिप करत नाहीत, असे समोर आले आहे. त्यामुळे गॉसिप करण्यात पुरुषही आघाडीवर असतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

महिलांप्रमाणेच पुरुषांनाही गॉसिपिंग करताना मजा येते आणि अशाप्रकारे गॉसिपिंग करण्याची ते एकही संधी सोडत नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अमेरिकेतील ओटावा विद्यापीठाने याबाबत नुकतेच एक सर्वेक्षण केले होते. त्यातून ही गोष्ट समोर आली आहे. महिलांच्या गॉसिपिंगचे विषय हे बऱ्याचदा इतर महिलांचे कपडे, राहणी आणि लुक्स किंवा बाजारात उपलब्ध होणारे साहित्य हे असतात. तर दुसरीकडे पुरुषांच्या गॉसिपिंगचे विषय हे पैसा, अलिशान राहणीमान, नोकरी, त्यातील ग्रोथ असे असतात.