गेल्या अनेक महिन्यांपासून मारूती सुझुकी कंपनी आपली लोकप्रिय कार ‘अल्टो’ची नवीन आवृत्ती आणणार असल्याची चर्चा होती. अखेर कंपनीने अल्टो 800 या लोकप्रिय मॉडेलची (फेसलिप्ट) नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी सादर केली आहे.

नव्या आवृत्तीमध्ये प्रामुख्याने डिझाईन, अंतर्गत भाग आणि सुरक्षाविषयक फिचर्समध्ये बदल करण्यात आलेला आहे. यात आता ड्रायव्हरच्या बाजूने सुरक्षेसाठी एयर बॅगची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच यात ईबीडी प्रणालीसह एबीएस सिस्टीम प्रदान केलेली आहे. या नवीन आवृत्तीमध्ये रिअर पार्कींग सेन्सर, सिटबेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टीमचाही अंतर्भाव केलेला आहे.

नवीन अल्टो तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असणार आहे. मारूती सुझुकीच्या नवीन अल्टो मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे एक्स-शोरूम मूल्य हे स्टँडर्ड आवृत्ती २.९४ लाख; स्टँडर्ड (ओ) २.९७ लाख; एलएक्सआय ३.५० लाख; एलएक्सआय (ओ) ३.५५ लाख आणि व्हीएक्सआय ३.७२ लाख रूपये इतके आहे. कंपनीच्या देशभरातील शोरूम्समधून याचे विविध व्हेरियंटस् विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नव्या अल्टोमध्ये ७९६ सीसी क्षमतेचे, थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन प्रदान करण्यात आले आहे. हे इंजिन बीएस-६ या मानकानुसार विकसित करण्यात आले असून याला ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समीशन प्रणालीशी संलग्न करण्यात आले आहे. यात सीएनजीचा पर्याय दिलेला नाही.