Maruti Suzuki Baleno चे फेसलिफ्ट व्हर्जन सध्या जोरदार चर्चेत आहे. टेस्टींगच्या दरम्यानही ही कार समोर आली होती. नुकत्याच आलेल्या रिपोर्टसनुसार, ही कार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात दाखल होणार आहे. या कारचे बुकींग सुरु झाल्याचेही कंपनीने सांगितले आहे. ११ हजारांपासून २१ हजार रुपयांपर्यंत भरुन या कारचे बुकींग करता येणार आहे. फेब्रुवारीपासून ग्राहकांना या कारची प्रत्यक्ष डिलिव्हरी केली जाईल. टेस्टींग दरम्यान या कारची काही छायाचित्रे लीक झाली होती. ग्राहकांना यातील दुसऱ्यांदा डिझाईन करण्यात आलेले मॉडेल मिळणार आहे.

नव्या बलेनोमध्ये बेसिक वेरियंटमध्येच प्रोजेक्टर हेडलॅम्प असण्याची शक्यता आहे. आता हे फिचर केवळ अल्फा वेरियंटमध्येच मिळते. या नव्या फेसलिफ्ट बलेनोच्या इंटेरियरमध्ये काही नवीन फिचर्स मिळणार आहेत. मेकॅनिकली या कारमध्ये आधीच्या कारपेक्षा कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत असेही कंपनीने सांगितले आहे. आताप्रमाणेच ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनांमध्ये असेल. यामध्ये १.२ लीटरचे पेट्रोल इंजिन असून ते ८३ bhp ची पॉवर आणि ११५ Nm टॉर्क तयार करतो. १.३ लीटरचे डिझेल इंजिन असून ते ७४ bhp पॉवर आणि १९० Nm टॉर्क तयार करतो. आताच्या बलेनोपेक्षा या नव्या मॉडेलची किंमत २५ ते ३० हजारांनी जास्त असण्याची शक्यता आहे.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे