News Flash

Micromax In 1 : 10 हजारांहून कमी किंमतीत 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप + 5000mAh बॅटरी

फक्त पहिल्या सेलमध्येच १० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदीची संधी

Micromax कंपनीने कालच (दि.१९) आपल्या In सीरिजमधील तिसरा स्मार्टफोन भारतात लाँच केला. ‘Micromax In 1’ हा आता कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आहे. कंपनीने हा फोन 6GB रॅम, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरीसह उतरवलाय. कंपनीने पहिल्या सेलमध्ये हा फोन १० हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध करणार असल्याचं जाहीर केलंय, त्यानंतर मात्र फोनच्या किंमतीत वाढ होईल.

Micromax In 1 स्पेसिफिकेशन्स :-
‘Micromax In 1’ या फोनमध्ये कंपनीने 6.67 इंचाचा फुल एचडी+ होल-पंच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 2.0 गीगाहर्ट्झ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली G52 GPU चा सपोर्ट मिळेल. फोनमधील स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 48 मेगापिक्सेल प्रायमरी, 2 मेगापिक्सेल डेप्थ आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर असलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. शिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. रिअर कॅमेऱ्यासाठी अॅडव्हान्स नाइट मोडही आहे. फोनमध्ये अँड्रॉइड 10 चा सपोर्ट असून मे महिन्यापर्यंत अँड्रॉइड 11 चा सपोर्टही दिला जाईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. पूर्ण चार्ज झाल्यावर ही बॅटरी 180 तासांपर्यंत म्यूझिक स्ट्रीमिंग, 24 तासांपर्यंत वेब ब्राउझिंग आणि 18 तासंपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. शिवाय फोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर असे शानदार फिचर्स आहेत. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल Vowifi, ड्युअल VoLte, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन/एसी आणि ब्लूटूथ 5.0 यांसारखे फिचर्स आहेत.

Micromax In 1 किंमत :-
26 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्टच्या वेबासाइटवर आणि माइक्रोमॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवरुन पहिल्यांदा हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. पहिल्या सेलमध्ये ‘Micromax In 1’ खरेदी करणाऱ्यांसाठी कंपनीने खास सवलत जाहीर केली आहे.  ‘Micromax In 1’ च्या 4 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेजची किंमत 10 हजार 499 रुपये आहे. पण पहिल्या सेलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी याची किंमत 9 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. पण पहिल्या सेलमध्ये ग्राहकांना 11 हजार 499 रुपयांत हे मॉडेल खरेदी करता येईल. हा फोन पर्पल आणि ब्लू अशा दोन रंगांमध्ये लाँच झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 1:53 pm

Web Title: micromax in 1 with mediatek helio g80 soc and 5000mah battery launched in india check price first sale date offer and specifications sas 89
Next Stories
1 200 पेक्षा कमी किंमतीत Reliance Jio चा ‘बेस्ट सेलर प्लॅन’, जाणून घ्या सविस्तर
2 आता १३ वर्षांखालील मुलांसाठीही येणार Instagram! फेसबुकची घोषणा!
3 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत आला Micromax In 1, मिळेल 48MP कॅमेरा + 5000mAh बॅटरी
Just Now!
X