05 July 2020

News Flash

सोशल मिडीयावर चेहऱ्यावरून वय ओळखणाऱ्या ‘हाऊ ओल्ड.नेट’चा धुमाकूळ

सध्या सोशल मिडीयावर मायक्रोसॉफ्टच्या 'हाऊ ओल्ड. नेट'चा प्रचंड बोलबाला सुरू आहे.

| May 4, 2015 06:58 am

सध्या सोशल मिडीयावर मायक्रोसॉफ्टच्या ‘हाऊ ओल्ड. नेट’चा प्रचंड बोलबाला सुरू आहे. त्यामुळे फेसबुकवर तुम्हाला सध्या मोठ्या प्रमाणावर तुमच्या मित्र-मैत्रिणींची छायाचित्रे आणि त्या छायाचित्रांनूसारचे आश्चर्यकारक निकाल पहायला मिळतील. तुम्ही स्वत:चे छायाचित्र अपलोड केल्यानंतर ‘हाऊ ओल्ड.नेट’ हे वेब अॅप्लिकेशन छायाचित्र पाहून तुमचे वय किती असेल याचा अंदाज लावते. या अॅप्लिकेशनमुळे येणारे निकाल तितकेसे अचूक नसले तरी नेटकरांना सध्या विरंगुळ्याचे नवे साधन उपलब्ध झाले आहे. चेहऱ्यावरून लावण्यात येणाऱ्या वयाच्या अंदाजामुळे सोशल कट्ट्यावर सध्या हास्यविनोदाला चांगलाच बहर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2015 6:58 am

Web Title: microsoft how old net will guess your age but do bit ignore the fineprint
टॅग Microsoft
Next Stories
1 ‘मायक्रोसॉफ्ट एज’ घेणार ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ची जागा
2 एचआयव्ही तपासणी आता घरीच करता येणार!
3 माणसाला अदृश्य करण्याचा प्रयोग यशस्वी
Just Now!
X