झेन या मोबाइल कंपनीने ‘झेन सिनेमॅक्स फोर जी’ हा नवीन फोर जी मोबाइल सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत बाजारात आणला आहे. सहा हजार रुपयांचे बजेट असणाऱ्या लोकांसाठी फोर जी मोबाइल म्हणून हा एक चांगला पर्याय आहे. स्मार्टफोनचा वापर इतका वाढला आहे की बऱ्याचदा दोन मोबाइल वापरावे लागतात अशा वेळी जर तुम्ही दुसरा स्वस्त फोर जी मोबाइल बघत असाल तर हा मोबाइल एक उत्तम पर्याय आह. ‘झेन सिनेमॅक्स फोर जी’ हा मोबाइल जिओ सिम कार्डला साहाय्य करतो. यात प्रोटेक्शन किट उपलब्ध आहे ज्यामधे डिस्प्ले सुरक्षित राहण्यासाठी स्क्रीन गार्ड देण्यात आले आहे शिवाय मोबाइल सुरक्षित राहण्यासाठी मोबाइलचे कव्हर देण्यात आले आहे आणि मोबाइल विकत घेतल्यापासून सहा महिन्यांमध्ये जर स्क्रीन तुटला तर तुम्ही एकदा तो विनामूल्य बदलू शकता. ‘झेन सिनेमॅक्स फोर जी’ या मोबाइलमध्ये ५.५ इंचांचा व्हीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे. कॅमेराच्या बाबतीत मोबाइलच्या मागील बाजूस पाच मेगापिक्सेल कॅमेरा आणि फ्लॅश देण्यात आला आहे आणि पुढील बाजूस पाच मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. ‘झेन सिनेमॅक्स फोर जी’मध्ये कॉड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे ज्याच्या मदतीने तुम्ही लहान आणि कमी ग्राफिक्स असलेले अ‍ॅप आणि गेम्स यात वापरू शकता. या मोबाइलमध्ये टू जीबी रॅम आणि १६ जीबी मेमरी देण्यात आली आहे आणि मेमरी कार्डचा उपयोग करून तुम्ही स्टोरेज ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता.

कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा मोबाइल दोन सिम कार्डला साहाय्य करतो तसेच टूजी, थ्रीजी, फोरजी आणि विओएलटीईला साहाय्य करतो. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम आहे. हा मोबाइल अँड्रॉइड मार्शमेलो या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. या मोबाइलमध्ये २९०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे ज्याच्या उपयोगामुळे तुम्ही एकदा चार्ज केल्यावर दिवसभर या मोबाइलचा उपयोग करू शकता. ‘झेन सिनेमॅक्स फोर जी’मध्ये स्वलेख कीबोर्ड देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही या मोबाइलमध्ये २२ भाषांचा उपयोग करू शकता.

फायदे:
-स्वस्त फोर जी मोबाइल.
-५.५ इंचांचा डिस्प्ले
-स्वलेख कीबोर्डच्या मदतीने २२ भाषांचा उपयोग करू शकतो.

तोटे:
-इतर दुसरे चांगले पर्याय उपलब्ध.
-बॅटरी कमी.
-जुनी ऑपेरेटिंग सिस्टम.

मोबाइलची किंमत :
रु. ६३९०/-

response.lokprabha@expressindia.com

सौजन्य- लोकप्रभा