14 August 2020

News Flash

पावसाळ्यात उद्भवणा-या श्वसनाच्या समस्यांपासून असे रहा दूर!

वातावरणात गारवा असल्यामुळे अनेकांच्या श्वसनासंबंधी तक्रारी सुरु होतात

डॉ. अरविंद काटे

एप्रिल, मे महिना संपत आला की प्रत्येकाला पावसाच्या आगमनाचे वेध लागतात. पावसाची एक सर जरी आली तर मन प्रसन्न करु जाते. त्यामुळे पावसाळा अनेकांच्या आवडता ऋतू आहे. परंतु, या ऋतूमध्ये काही आजार आणि शारीरिक व्याधीही बरोबर येत असतात. वातावरणात सतत गारवा असल्यामुळे अनेकांना श्वसनासंबंधी तक्रारी, समस्या जाणवू लागतात. यातच जुनी सर्दी, दमा असे आजार असलेल्या व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागते. परंतु, जर आपण वेळीच योग्य ती काळजी घेतली तर श्वसनासंबंधी कोणत्याही समस्या किंवा आजार होणार नाही. चला तर मग पाहुयात पावसाळ्या श्वसनासंबंधींच्या तक्रारींपासून दूर कसे रहावे.

अशी घ्या आरोग्याची काळजी

१. फुफ्फुसाचं आरोग्य चांगलं राहिल याकडे लक्ष द्या आणि त्याप्रमाणेच आहारात पदार्थांचा समावेश करा. ओमेगा ३ असलेल्या पदार्थांचं सेवन करा.  यात अक्रोड, ब्रोकोली, सफरचंद अशा फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा.

२. भरपूर पाणी प्या.

३. बेरी, पपई, अननस, कोवी, गाजर, हळद, आलं यांचा जेवणात समावेश करा.

४. दररोज व्यायाम करा. स्वस्थ राहण्यासाठी योगाभ्यास तसेच ध्यानधारणा करा.

५. दररोज गरम पाण्याची वाफ घ्या.त्यामुळे फुफ्फुसामध्ये कफ जमा होणार नाही.

६. मिठाच्या पाण्याने गुळण्या करा.

७. धुम्रपान करणे टाळा.

८. खोकताना व शिंकताना तोंडासमोर रुमाल धरा.

९. दमा असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजेच्या औषधांचा घरात साठा करा.

१०.पावसात शक्यतो बाहेर पडणे टाळा. धूर,धूळ आणि प्रदुषकांपासून दूर रहा.

११.रस्त्यावर इतरत्र थुंकू नका.

दरम्यान, या दिवसात निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. जसे सतत पावसात भिजणे, ओले कपडे अंगावर अधिक काळ राहणे, केस ओले न ठेवणे, मास्कचा वापर करणे, स्वच्छता राखणे तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

( लेखक डॉ. अरविंद काटे हे झेन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पि़टल, चेंबूर येथे फुफ्फुसविकार तज्ज्ञ आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 5:36 pm

Web Title: monitor respiratory illness and home nebulization ssj 93
Next Stories
1 बदाम खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
2 JioMart अ‍ॅप झालं लाँच, शॉपिंगवर मिळेल डिस्काउंट व फ्री होम डिलिव्हरी
3 पाठदुखीनं त्रस्त आहात? आजच बदला ‘या’ सवयी
Just Now!
X