Lenovo ची मालकी असलेल्या मोटोरोला (Motorola )कंपनीने भारतीय बाजारात अलिकडेच Moto G30 आणि Moto G10 Power हे दोन लेटेस्ट बजेट स्मार्टफोन लाँच केलेत. मोटोरोलाच्या या दोन्ही फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असून स्टॉक अँड्रॉईड 11 चा सपोर्ट आहे. शिवाय सुरक्षेसाठी यामध्ये ThinkShield या खास टेक्नॉलॉजीचा वापरही करण्यात आला आहे. यातील Moto G10 Power या स्मार्टफोनमध्ये कंपनीने तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन आज पहिल्यांदाच सेलमध्ये खरेदीसाठीही उपलब्ध असणार आहे. दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर Moto G10 Power च्या सेलला सुरूवातही झाली आहे. सेलमध्ये  Moto G10 Power च्या खरेदीवर काही आकर्षक ऑफर्स आहेत. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 10 टक्के किंवा एक हजार रुपयांची सवलत मिळेल. याशिवाय फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरही 5 टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. तसेच, सेलमध्ये हा फोन दरमहा 1667 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयच्या पर्यायासह देखील खरेदी करता येईल.

Moto G10 Power स्पेसिफिकेशन्स :-
Moto G10 Power मध्ये स्टॉक अँड्रॉइड 11 चा सपोर्ट असून 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर,  4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. मेमरी कार्डद्वारे यातील स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. शिवाय या फोनमध्येही क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील चारही कॅमेरे अनुक्रमे 48 मेगापिक्सेल मेन लेन्स, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल, 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल डेफ्थ सेन्सर आहे. शिवाय सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सेलचा कॅमेराही मिळेल. तर, कनेक्टिव्हिटीसाठी Moto G10 Power या फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, USB टाईप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. शिवाय फोनच्या मागील बाजूला रिअर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही दिलं आहे. Moto G10 Power मध्येही कंपनीने 20W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही दिली आहे.

Moto G30, Moto G10 Power ची किंमत आणि सेल :-
Moto G10 Power ची किंमत 9 हजार 999 रुपये असून हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजमध्ये मिळेल. हा फोन ऑरोरा ग्रे (Aurora Grey) आणि ब्रीज ब्लू (Breeze Blue) अशा दोन रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.