Motorola One Power हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. आज नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात कंपनीने हा फोन लॉन्च केला. या हँडसेटची सर्वात जमेची बाजू म्हणजे यामध्ये तब्बल 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसंच, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर, डिस्प्ले नॉच आणि दोन रिअर कॅमेरे आहेत. महत्त्वाचं म्हणजे कंपनीचा हा नवा फोन गुगल अॅन्ड्रॉइड वन या प्रोग्रामचा भाग आहे, त्यामुळे फोनसाठी वेळोवेळी गुगलचे अपडेट मिळतील. तसंच, फ्लिपकार्ट या संकेतस्थळावरच हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेलं एकमेव व्हेरिअंट या फोनचं असणार आहे. मेमरीकार्डद्वारे 256 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येईल. फ्लिपकार्टवर या फोनसाठी नोंदणी सुरू झाली असून 5 ऑक्टोबर दुपारी 12 वाजेपासून फोनची विक्री सुरू होणार आहे. फोनच्या मागील बाजूला 16 आणि 5 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत, तर सेल्फीसाठी 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. भारतात या फोनची किंमत 15,999 आहे. भारतात लोकप्रिय असलेल्या शाओमी रेडमी नोट 5 प्रो, आसूस झेनफोन मॅक्स प्रो एम 1 आणि नोकिया 6.1 प्लसला टक्कर देण्याचं आव्हान ‘मोटोरोला वन पावर’पुढं असेल.

मोटोरोला वन पावरमध्ये गुगल लेंस फिचर देण्यात आलं आहे, याद्वारे कोणत्याही ऑब्जेक्टवर कॅमेरा धरल्यास लेंसद्वारे त्याच्याशी निगडीत सर्व माहिती सर्च करता येणार आहे. फोनमध्ये अडेप्टिव ब्राइटनेस फिचर आहे. चांगल्या साउंड क्वालिटीसाठी फोनच्या खालच्या बाजूला डॉल्बी ऑडियो असलेले दोन स्पीकर ग्रिल्स देण्यात आले आहेत. तसंच ग्राफिक्ससाठी अड्रेनो ५०९ जीपीयू सुविधा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4 जी एलटीई, वायफाय 802.11 एसी, ब्लूटुथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, युएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे.

स्पेसिफिकेशन्स –

डिस्प्ले – 6.20 इंच फुल एचडी+ एलसीडी मॅक्स विजन पॅनल
फ्रंट कॅमेरा – 12-मेगापिक्सल
रिझोल्यूशन- 1080×2246 पिक्सल
रॅम – 4 जीबी
ओएस – अॅन्ड्रॉइड 8.0
स्टोरेज – 64 जीबी
रियर कॅमेरा – 16-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल
बॅटरी क्षमता – 5000 एमएएच

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorola new smartphone one power launched in india
First published on: 24-09-2018 at 15:04 IST