Motorola कंपनीचा 64 मेगापिक्सेल क्षमतेचा मुख्य कॅमेरा असलेला जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची आज (दि.10) चांगली संधी आहे. कंपनीचा Motorola one fusion+ हा स्मार्टफोन आज ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर फ्लॅश-सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या या फोनसाठी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर दुपारी 12 वाजेपासून सेल सुरू होत आहे. सेलमध्ये Motorola one fusion+ च्या खेरदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. फ्लिपकार्टवरील सेलमध्ये ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’द्वारे हा फोन खरेदी केल्यास 5 टक्के डिस्काउंट मिळेल. तर, ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’वरही 5 टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. याशिवाय दरमहा 1,945 रुपये नो कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी आहे.

स्पेसिफिकेशन्स :-
क्वॉड रिअर कॅमेरा म्हणजे मागील बाजूला चार कॅमेऱ्याचा सेटअप असून यातील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. तसेच, फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही या फोनमध्ये आहे. ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेल्या Motorola one fusion+ फोनला 6.5 इंच फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) नॉच-लेस डिस्प्ले आहे. अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेल्या या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 730जी चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी ऐड्रेनो 618 जीपीयू आहे. इंटर्नल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे तब्बल 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. फोनच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फोनमध्ये डेडिकेटेड गुगल असिस्टंट बटणही दिलं आहे.

किंमत आणि ऑफर :- मोटोरोला वन फ्यूजन प्लस (6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज) ची भारतात किंमत 17 हजार 499 रुपये असून ट्विलाइट ब्लू आणि मूनलाइट व्हाइट अशा दोन कलरच्या पर्ययांमध्ये हा फोन उपलब्ध आहे.