‘मोटोरोला’ने फोल्डेबल फोनच्या सेगमेंटमध्ये गेल्याच महिन्यात पदार्पण करताना आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Motorola Razr (2019) लाँच केला. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच करण्यात आलेला हा फोन लवकरच भारतातही लाँच होणार आहे. मोटोरोलाने रेझर 2019 ला भारतात लाँच करण्यासाठी टीझर लाँच केला आहे. मोटोरोला इंडियाने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. Motorola Razr (2019) ला लवकरच भारतात लाँच करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, कंपनीने लाँच करण्याची तारीख अद्याप जाहीर केली नाही.

Motorola Razr (2019) या फोनची विक्री जानेवारी महिन्यापासून सुरू होणार असून या फोनची टक्कर सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड आणि हुवेईच्या मेट एक्ससोबत राहणार आहे. कंपनीकडून या फोनच्या किंमतीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. पण, अमेरिकेत 1499 डॉलर इतकी याची किंमत ठरवण्यात आली असून भारतातही तितकीच किंमत(जवळपास एक लाख सहा हजार रुपये) असण्याची शक्यता आहे.

फीचर्स :

आतापर्यंत लाँच झालेल्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या तुलनेत हा फोल्डेबल फोन बराच वेगळा आहे. हा फोन व्हर्टिकली (उभा) फोल्ड होतो. यापूर्वी वर्षाच्या सुरूवातीलाच मोटोरोलाचे उपाध्यक्ष(ग्लोबल प्रोडक्ट्स) डॅन कॅरी यांनी सॅमसंग किंवा Huawei या कंपन्यांची स्टाइल कॉपी न करता स्वतःच्या वेगळ्या स्टाइलमध्ये नव्या प्रकारचा फोल्डेबल फोन लाँच केला जाईल असं सांगितलं होतं. जुन्या मोटो रेझरनुसार कंपनीने या फोनचं डिझाइन ठरवलंय. ‘मोटो रेझर’ 2019 मध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्यात. यातील एक स्क्रीन फोनच्या आतील बाजूला आणि दुसरी स्क्रीन बाहेरच्या बाजूला आहे. अनफोल्डेड कंडिशनमध्ये आतील स्क्रीनचं आकारमान 6.2 इंच असतं. यात फ्लेक्सिबल OLED इंटर्नल डिस्प्ले, 21:9 सिनेमाव्हिजन अ‍ॅस्पेक्ट रेशोसह आहे. तर , फोन फोल्ड झाल्यानंतर बाहेरच्या बाजूला 2.7 इंच स्क्रीन असते. बाहेरच्या डिस्प्लेवर युजर्सना नोटिफिकेशन्स मिळतील. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर बाहेरच्या पॅनलवरच आहे.

आणखी वाचा- Mi Band 3i चा आजपासून सेल, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

फोटोग्राफीसाठी दोन कॅमेरे :
फोटॉग्राफीसाठी या फोनमध्ये दोन कॅमेरे आहे. यामध्ये नाइट व्हिजन पर्यायासह 16 मेगापिक्सल क्षमतेचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा इंटर्नल कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 9 पाय आउट-ऑफ-द-बॉक्सवर कार्यरत असेल, तसंच हा फोन ई-सिम कार्डलाही सपोर्ट करतो. हा फोन 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटर्नल स्टोरेज क्षमतेसह लाँच करण्यात आला असून यामध्ये स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट प्रोसेसर आहे.