प्रेमभंग झाल्यानंतर आपल्यापैकी अनेकजणांना काही काळासाठी ‘ ये दुनियाँ,  ये मैफिल, मेरे काम की नही’ या अवस्थेचा अनुभव आला असेल. हा कटू अनुभव विसरण्यासाठी नक्की कोणती मात्रा लागू पडेल हा यक्षप्रश्न आजपर्यंत भल्याभल्यांना पडला असेल.  या काळात नक्की काय करावे याबद्दल मार्गदर्शन करणारी काही पुस्तके हफिंग्टन पोस्ट या संकेतस्थळाने नुकतीच प्रसिद्ध केली आहेत. त्यापैकी काही मोजक्या पुस्तकांची यादी आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

द ब्रेकअप बायबल्स (लेखिका- मेलिसा कांटोर)
प्रेमभंगाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी , विशेष करून मुलींसाठी मेलिसा कांटोर हिने लिहलेले द ‘ब्रेकअप बायबल्स’ हे पुस्तक उपयुक्त ठरू शकते. या पुस्तकात एका तरूण मुलीची गोष्ट सांगण्यात आली असून, प्रियकरासोबतचे नाते संपुष्टात आल्यावर तिच्या जीवनात कशाप्रकारे बदल घडतात याची कहाणी सांगण्यात आली आहे. या पुस्तकात पहिल्यांदाच प्रेमभंगाच्या अनुभवाला सामोरे जात असणाऱ्या तरूण-तरूणींसाठी गोष्टीच्या माध्यमातून काही उपाय सुचवले आहेत.

द पॉवर ऑफ नाऊ( लेखक- इकहार्ट टोले)
अध्यात्मिक गुरू असणाऱ्या इकहार्ट टोले यांनी त्यांच्या ‘द पॉवर ऑफ नाऊ’ या पुस्तकातून प्रेमभंगाच्या काळात व्यक्ती वर्तमानकाळात जगणेच कशाप्रकारे विसरून जाते,  या संकल्पनेचे विश्लेषण केले आहे. फक्त वर्तमानकाळावर लक्ष केंद्रित केल्यास व्यक्तीचे मन प्रेमभंगातून लवकर सावरू शकते, असे पुस्तकातून सांगण्यात आले आहे.

हाऊ टू हिल अ ब्रोकन हार्ट इन थर्टी डेज( लेखक- होवार्ड ब्रोन्सन आणि माईक राईली)
लेखक होवार्ड ब्रोन्सन आणि माईक राईली या दोघांनी त्यांच्या पुस्तकात प्रेमभंग झाल्यानंतर तुमचा दिनक्रम कसा असावा, भावनांना कशाप्रकारे आवर घालावा आणि भविष्यकाळाविषयी सकारात्मक विचार कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले आहे. जगण्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन व्यवहारी असेल तर हे पुस्तक तुम्हाल नक्कीच मदत करू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेटिंग पास्ट युअर ब्रेक-अप- (लेखिका- सुसान इलिओट्ट)
प्रेमभंगाचा कटू अनुभव तुम्ही भविष्यातील चांगल्या घटनेत कशाप्रकारे परावर्तित करू शकता, याचे धडे लेखिकेने ‘गेटिंग पास्ट युअर ब्रेक-अप’ या पुस्तकातून दिले आहेत.  या पुस्तकातून मार्गदर्शन करताना परिस्थितीचा विचार करून व्यक्तीने व्यावहारिक निर्णय कसे घ्यावेत याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे.  प्रेमभंगानंतर कोणाकडून तरी ठोस असा सल्ला मिळण्याच्या प्रतिक्षेत तुम्ही असाल तर ‘गेटिंग पास्ट युअर ब्रेक-अप’ हे पुस्तक जरूर वाचा’.