जीमेल हा सध्या आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक झाला आहे. इंटरनेटने जग जवळ आल्याने जीमेलचा वापर वाढला. जीमेलमध्ये युजर्सना उपयुक्त असे अनेक बदल मागच्या काही दिवसांत झाले. आता जीमेल आणखी नवीन बदल घेऊन आपल्या समोर येणार आहे. यामुळे युजर्सचा वापर आणखी सोपा होणार आहे. सध्या जीमेल इनबॉक्समध्ये ‘बंडल रिमांइडर’ आणि ‘पिन मेल’ सारख्या फिचर्सची चाचणी करत आहेत. याशिवाय आणखी तीन नवीन फिचर्स नुकतेच जीमेलमध्ये आले आहेत. युजर्सना जीमेलचा वापर करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी नवे फिचर्स सुरू केले आहेत. या फिचर्समध्येदेखील काही समस्या उद्भवल्यास त्यात सुधारणा करणार असल्याचे गुगलने सांगितले आहे. आता नव्याने येणारे तीन फिचर्स नेमके कोणते जाणून घेऊया…
Strikethrough
स्ट्राइकथ्रूच्या माध्यमातून युजर्सना व्हिज्यूअल क्यूच्या माध्यमातून एडिटींगची सूचना देण्याचे काम करत होते. यामुळे युजर्सना मेल टाइप करताना त्रास होत असल्याच्या तक्रारी गुगलकडे आल्या होत्या. मात्र आता ते फिचर अपडेट करण्यात आले असून त्यामध्ये एक शॉर्टकट् पर्याय देण्यात आला आहे.
Undo/Redo
जी मेलच्या या फिचर्सचा अनेक युजर्सना फायदा होणार आहे. अन-डू फिचरमुळे चुकून डिलीट केलेले कॉन्टॅक्ट पुन्हा रिस्टोअर करता येऊ शकतील. त्याशिवाय जी मेलमध्ये मेल लिहीत असताना पूर्वी केवळ अन-डूचा पर्याय उपलब्ध होता. मात्र आता अन-डूसोबतच री-डूचाही पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
डाउनलोड एज डॉट.ईएमएल
आतापर्यंत डाऊनलोड केलेला मेसेज मेलमध्ये अॅटॅच करता येत नव्हता. मात्र आता या नवीन फिचरच्या मदतीने डाउनलोडेड मेसेजला युजर्स आपल्या इ-मेलमध्ये अटॅचमेंट म्हणून अॅड करू शकतात.