News Flash

गुगल ड्राईव्हवरही राहणार नाही आता व्हॉट्स अॅपचा डेटा सुरक्षित

गुगल ड्राईव्हवर बॅकअप घेतलेला हा डेटा गुगल वाचू शकते. तसेच कोणत्या सुरक्षा एजन्सीकडून या डेटाची मागणी करण्यात आल्यास त्यांनाही तो डेटा देण्यात येईल.

संग्रहित छायाचित्र

व्हॉट्स अॅप हा आता आपल्यातील अनेकांच्या जगण्यातील महत्त्वाचा हिस्सा झाला आहे. पण आता हे अॅप्लिकेशन वापरणे म्हणावे तितके सुरक्षित राहीलेले नाही. आपल्याकडे व्हॉट्स अॅपचा डेटा जास्त झाल्यावर आपण त्याचा बॅकअप घेतो. मात्र आता बॅकअप घेतलेला व्हॉट्स अॅपचा डेटा सुरक्षित नसेल असे समोर आले आहे. गुगल ड्राईव्हवर बॅकअप घेतलेला हा डेटा गुगल वाचू शकते. तसेच कोणत्या सुरक्षा एजन्सीकडून या डेटाची मागणी करण्यात आल्यास त्यांनाही तो डेटा देण्यात येईल.

व्हॉट्स अॅप आपल्या युजर्सना ‘एंड टु एंड इन्क्रिप्शन’ ची सुविधा देते. याचा फायदा म्हणजे आपण एखादा मेसेज कोणाला पाठवल्यास तो मेसेज किंवा संबंधित फाईल केवळ त्या व्यक्तीलाच दिसते, आणि इतर कोणालाही दिसत नाही. विविध अफवा आणि पसरणाऱ्या चुकीच्या गोष्टी नेमक्या कोणाकडून व्हायरल होतात हे ओळखण्यासाठी विशिष्ट यंत्रणा असावी. यासाठी भारत सरकारकडून मागच्या काही दिवसांपासून व्हॉट्स अॅपवर दबाव टाकण्यात येत आहे. पण असे केल्यास युजरची गोपनियता नष्ट होत असल्य़ाने आम्ही अशाप्रकारची यंत्रणा बनवू शकत नाही असे कंपनीने भारत सरकारला कळवले आहे.

दरम्यान, व्हॉट्स अॅपने गुगलसोबत यासाठी युती केली असून ज्याद्वारे व्हॉट्स अॅपचे मेसेज आता गुगल ड्राईव्हमध्ये राहू शकणार आहेत. यामध्येही आपल्याला हा बॅक अप हवा आहे की नाही याबाबतचा निर्णय युजरला घेता येणार आहे. पण हा डेटा गोपनिय राहणार नसून गुगलकडे त्याचा ट्रॅक ठेवला जाणार आहे. एखाद्या सरकारी एजन्सीने गुगलकडे या डेटाची मागणी केल्यास कंपनीला तो डेटा एजन्सीला पुरविणे भाग आहे. गुन्हेगारीसारख्या गोष्टी उघडकीस येण्यास याचा निश्चितच फायदा होईल. गुगलकडून प्रत्येक युजरला १५ जीबीची स्पेस मिळते. त्यातच आता हा व्हॉटस अॅपचा बॅकअप सेव्ह होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 2:36 pm

Web Title: no secret on google drive whatsapp data
Next Stories
1 चार कॅमेरे आणि 8 GB रॅम, OPPO चा नवा स्मार्टफोन
2 द ग्रेट ऑनर सेल ! अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स
3 विद्यार्थ्यांसाठी इंस्टाग्राम आणणार खास फिचर, काय आहे खासियत?
Just Now!
X