मोबाईल कंपन्या दिवसागणिक बाजारात नवनवीन स्मार्टफोन बाजारात दाखल करतात. Xiaomi Redmi आणि Oppo F11 Pro नंतर नोकियाही ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा स्मार्टफोन घेऊन आला आहे. Nokia X71 असं या फोनचं नाव आहे. हा फोन होल-पंच डिस्प्ले असलेला नोकियाचा पहिलावहिला फोन आहे.

नोकिया मोबाइल तयार करणारी HMD Global कंपनीने Nokia X71 फोनची निर्मीती केली आहे. या फोनची किंमत २६९९९ रूपये आहे. प्री बुकींग सुरू झाली असून १० एप्रिल रोजी हा फोन भारतीय बाजारपेठेत उपलबद्द होणार आहे. Nokia X71चा ६.३९ इंचाचा फुल स्क्रीन डिस्प्ले आहे. तसेच Nokia X71 हा फोन होल-पंच डिस्प्लेचा नोकियाचा पहिला फोन आहे. या स्मार्टफोनचे पावर बटन वाइट LED लाइट सोबत दिला आहे. सिक्यॉरिटीसाठी फोनच्या पाठीमागे फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे. Nokia X71मध्ये 6GB रॅमसोबत 128GB इंटरनल स्टोरेज दिले आहे.

नोकियाच्या या नव्या फोनच्या मागील बाजूला तीन कॅमेरे दिले जाण्याची शक्यता आहे. Nokia X71 या स्मार्टफोनसह नोकिया ५ रियरचा जगातला पहिला स्मार्टफोन ही घेऊन येत आहे. हा स्मार्टफोन सध्या तयवानमध्ये लाँच करण्यात येत आहे. लवकरच हा फोन अन्य देशामध्ये उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनचे नाव Nokia 9 Pureview असे असणार आहे.

या फोनमध्येही आहे ४८ मेगापिक्सल कॅमेरा

Oppo F11 Pro – 
Oppo F11 ला ड्युएल कॅमरा सेटअप आहे. आणि याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचा प्रायमरी रिअर कॅमेरा तब्बल ४८ मेगापिक्सल आहे. तर १२ मेगापिक्सेलचा सेंकडरी सेन्सर कॅमेरा आहे. याचा सेल्फी कॅमेरा पॉप-अप आहे. हा १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणार आहे.

Redmi Note 7 : 
नव्या Redmi मालिकेची सुरूवात Redmi Note 7 द्वारा झाली आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. तर सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये AI फीचर्स आणि पोट्रेट मोड आहे. रेडमी नोट 7 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरसह अँन्ड्रॉइड 8.1 ओरियोवर कार्यरत असेल.

विवो व्ही १५ प्रो –
२८ हजार ९९० रुपये किंमतीच्या या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह ४८ मेगापिक्सल कॅमेरा, ३२ मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज या फोनमध्ये आहे. ६.३९ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे.

ऑनर व्ह्यू २० –
हा मोबाइल यावर्षी जानेवारी महिन्यात लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज या दोन पर्यायात हा फोन उपलब्ध आहे.