30 November 2020

News Flash

ऑफीसमध्ये ‘या’ गोष्टी आवर्जून पाळा

प्रतिमा चांगली राहण्यास उपयुक्त

आपल्यातील अनेक जण दिवसातील सर्वाधिक वेळ ऑफीसमध्ये असतो. सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने कामाचा ताणही नकळत वाढला आहे. दिवसातील साधारण ९ ते १० तास ऑफीसमध्ये असल्याने हे अनेकांसाठी सेकंड होमच असते. आपल्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांशी जमवून घेणे, येथील परिस्थितीचा सामना करणे आणि त्यात कामाच्या बाबतीत स्वत:ला सिद्ध करणे अशा अनेक गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतात. या सगळ्या बाबतीत आपले वागणे, बोलणे आणि कामातील नेमकेपणा यावरुन अनेकांकडून आपली परीक्षा होत असते. यामध्ये काही गोष्टी कटाक्षाने पाळल्यास आपली प्रतिमा चांगली राहण्यास तसेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास निश्चितच मदत होते. मात्र त्यासाठी त्या गोष्टी अंगी बाणवणेही तितकेच गरजेचे असते.

सामाजिक सहभाग वाढवा

ऑफीसमध्ये दिवसभर रहायचे आहे म्हटल्यावर आपले आपल्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध असणे आवश्यक असते. त्यामुळे स्वत:हून पुढाकार घेऊन बोलण्याचा तुमचा स्वभाव नसेल तरीही तुम्ही त्यावर मात करा. अनेकदा आपल्या स्वभावामुळे आपण कंपनीच्या गेटटूगेदरला जाणे टाळतो किंवा इतरांपासून वेगळे राहतो. मात्र त्यामुळे आपण आपल्या सहकाऱ्यांशी अधिक चांगल्या पद्धतीने जमवून घेऊ शकत नाही. सहकाऱ्यांशी कमी बोलणे किंवा टीम वर्कमध्ये आपल्याच विश्वात राहणे टाळायला हवे. अशा वागण्याने समोरच्या व्यक्तीवर तुमचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. आणि त्यामुळे नकळत तुम्ही सगळ्यांपासून वेगळे राहू लागता.

वैयक्तिक विषयांवर बोलणे टाळा

ऑफीसमध्ये आपण दिवसातील जास्त कालावधी असल्याने आपण एकमेकांशी चांगले कनेक्ट होतो. पण एकमेकांशी वैयक्तिक गोष्टींबाबत बोलणे हे काही वेळा समोरच्याला आवडत नाही. त्यामुळे सहकाऱ्यांना त्यांच्या खासगी गोष्टींबाबत विचारताना विचार करुन विचारा.

काम झाल्यावर ई-मेल पाठवणं

कामासंदर्भात दिवसभरात आपल्याल अनेकजण मेल पाठवतात किंवा आपण एखाद्या व्यक्तीला मेल पाठवतो. रोज येणारे हे ई-मेल पाहणे आणि त्यांना वेळेत उत्तर देणे हे एक काम असते. पण हे काम वेळच्यावेळी झालेले केव्हाही चांगले. घाईमध्ये मेल करताना अनेकजण विषय लिहीणे विसरतात किंवा एखादी फाईल अॅटॅच करायची राहून जाते. मात्र असे न करता नीट लक्ष देऊन मेल करणे किंवा मेलला रिप्लाय कऱणे आवश्यक असते. या गोष्टी लहान वाटत असल्या तरीही तुमचा प्रभाव पडण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. त्यामुळे मेल करणे किंवा काही ऑफीशियल गोष्टींबाबत तुम्ही जागरुक असणे आवश्यक आहे.

तत्परता दाखवा

आपल्याला वरिष्ठाने एखादे काम सांगितले की ते अपेक्षित वेळेत होईल याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ऑफीसमध्ये आणि वरिष्ठांसमोर तुमची प्रतिमा सुधारण्यास मदत होते. अनेकांना ऑफीसला किंवा एखाद्या महत्त्वाच्या मिटींगलाही वेळेत पोहचण्याची सवय नसते. त्यामुळे तुमच्याकडे आळशी किंवा गांभिर्य नसलेले अशा नजरेने पाहिले जाऊ शकते. असे करणे टाळा. योग्य पद्धतीने नियोजन केल्यास हे शक्य असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 11:00 am

Web Title: office atticates one should follow important tips
Next Stories
1 गुंतवणुकीचा विचार करताय? हे नक्की वाचा
2 बहुप्रतिक्षित one plus 5 T लावा रेड अखेर भारतात दाखल
3 दिवसभर बसून काम करताय? ‘हे’ व्यायाम नक्की करा
Just Now!
X