21 November 2019

News Flash

OnePlus 7 चं नवं व्हेरिअंट लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

15 जुलै रोजी अॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान नवं व्हेरिअंट विक्रीसाठी उपलब्ध केलं जाणार

मे महिन्यात लाँच झालेल्या वनप्लस 7 स्मार्टफोनची 4 जूनपासून भारतात विक्री सुरू झालीये. आतापर्यंत ग्राहकांसाठी या फोनचा 6 जीबी रॅम असलेला व्हेरिअंट मिरर ग्रे कलरमध्ये, 8GB रॅम व्हेरिअंट रेड आणि मिरर ग्रे कलरमध्ये उपलब्ध होता. आता कंपनीने यातील 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज क्षमता असलेलं व्हेरिअंट नवीन ‘मिरर ब्ल्यू कलर’मध्येही उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. 15 जुलै रोजी अॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान हे नवं व्हेरिअंट विक्रीसाठी उपलब्ध केलं जाणार आहे.

अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल, तसंच वनप्लसच्या अधिकृत संकेतस्थळावरुनही हा फोन खरेदी करता येईल. वनप्लस 7 च्या मिरर ब्ल्यू व्हेरिअंटची किंमत 32 हजार 999 रुपये आहे. अॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना 1,750 रुपये कॅशबॅक मिळेल. याच्या 8GB RAM आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 37 हजार 999 रुपये इतकी आहे.

या फोनमध्ये मागील बाजूला ट्रिपलऐवजी ड्युअल कॅमेऱ्याचा सेटअप(48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल)असून सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर 3 हजार 700 मिलिअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

अन्य स्पेसिफिकेशन्स –
वॉटरड्रॉप नॉच 6.41 इंचाचा फुल एचडी प्लस ऑप्टीक एमोल्ड डिस्प्ले
कॉर्निंग गोरिला ग्लास 6
अॅण्ड्राइड 9 पाय बेस्ड ऑक्सिजन ओएसवर असणारं क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर

First Published on July 9, 2019 12:01 pm

Web Title: oneplus 7 mirror blue variant launched know price and all features sas 89
Just Now!
X