OnePlus Nord हा लेटेस्ट स्मार्टफोन आज(दि.31) खरेदी करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर दुपारी 1 वाजेपासून ‘फ्लॅश सेल’मध्ये हा फोन खरेदी करता येणार आहे. कंपनीने OnePlus Nord हा फोन तीन व्हेरिअंटमध्ये आणला असला तरी, सध्या OnePlus Nord च्या केवळ 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅम व्हेरिअंटचीच विक्री होणार आहे. तर, 6 जीबी रॅम मॉडेलची विक्री भारतात सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. पण अद्याप नेमकी तारीख समोर आलेली नाही.

OnePlus Nord स्पेसिफिकेशन्स –
वन प्लसने गेल्या महिन्यात 21 जुलै रोजी आपला हा स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला. यासोबतच कंपनीने अनेक दिवसांनंतर ‘मिड-रेंज सेगमेंट’मध्ये पुनरागमन केलं. OnePlus Nord मध्ये सेल्फीसाठी 32+8 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये सोनी आयएमएक्स 616 सेन्सर आहे. तर, फोनच्या मागील बाजूला 48MP प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. 48MP प्राइमरी कॅमेऱ्याशिवाय 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. वनप्लस नॉर्डमध्ये अल्ट्राशॉट एचडीआर, नाइटस्केप, सुपर मॅक्रो, पोर्ट्रेट, प्रो-मोड, पॅनोरमा, एआय सीन डिटेक्शन, RAW इमेज आणि अल्ट्रा वाइड सेल्फी यांसारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगचीही क्षमता आहे. ब्लू मार्बल आणि ग्रे ऑक्सी या दोन कलर्सचे पर्याय या फोनसाठी आहेत. ड्युअल-सिम कार्डचा सपोर्ट असलेला OnePlus Nord अँड्रॉइड 10 वर आधारित OxygenOS 10.5 वर कार्यरत आहे. यात 6.44 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) फ्लुइड एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765जी प्रोसेसर आणि 12 जीबीपर्यंत रॅम आहे. 184 ग्रॅम इतकं या फोनचं वजन असून फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4,115mAh क्षमतेची बॅटरी यामध्ये देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 802.11एसी, ब्लुटूथ 5.1, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी आणि युएसबी टाइप-सी पोर्ट यांसारखे फीचर्स आहेत. या फोनसोबत कंपनी अनेक दिवसांनंतर मिड-रेंज सेगमेंटमध्ये पुनरागमन केलं आहे. तीन व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे.

OnePlus Nord किंमत –
OnePlus Nord च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत भारतीय बाजारपेठेत 24 हजार 999 इतकी आहे. तर, 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 27 हजार 999 रूपये आणि 29 हजार 999 रूपये इतकी आहे.