News Flash

चार कॅमेऱ्यांच्या Oppo F15 चा आजपासून सेल, जाणून घ्या ऑफर्स

केवळ पाच मिनिटे चार्ज केल्यानंतर दोन तासांचा टॉकटाइम बॅकअप

‘ओप्पो’ने नुकताच आपला नवा स्मार्टफोन Oppo F15 लाँच केला असून आजपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही इ-कॉमर्स संकेतस्थळांवर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध असेल. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये VOOC 3.0 फ्लॅश चार्ज सपॉर्टसह 4,000 mAh क्षमतेची बॅटरी असून केवळ पाच मिनिटे चार्ज केल्यानंतर हा फोन दोन तासांचा टॉकटाइम बॅकअप देईल असा कंपनीचा दावा आहे. 19 हजार 990 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत असून यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. याशिवाय दोन्ही संकेतस्थळांवर फोनच्या खरेदीवर अनेक आकर्षक ऑफर्सही आहेत.

48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा :
या स्मार्टफोनमध्ये स्लीक डिझाइन असून 6.4 इंचाची फुल HD+ AMOLED स्क्रीन आहे. गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन असलेल्या Oppo F15 च्या मागील बाजूला क्वॉड-कॅमेरा सेटअप आहे. म्हणजेच मागील बाजूला चार कॅमेरे असून यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल क्षमतेचा असून अन्य कॅमेरे 8, 2 आणि 2 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कॅमेऱ्यात प्रोफेशनल मोड, पॅनोरमा, पोर्ट्रेट, नाइट सीन, टाइम-लॅप्स फोटोग्राफी, स्लो मोशन यांसारखे मोड आहेत.

आणखी वाचा – ‘सॅमसंग’चा ढासू स्मार्टफोन , दिवसभर टिकणार अवघ्या 30 मिनटांची चार्जिंग

0.32 सेकंदात अनलॉक होतो फोन :
स्मार्टफोनमधील स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असून हा स्मार्टफोन 0.32 सेकंदात अनलॉक होतो असंही कंपनीने म्हटलंय. ओप्पोचा हा स्मार्टफोन लाइटनिंग ब्लॅक आणि युनिकॉर्न व्हाइट कलरमध्ये मिळेल. हा स्मार्टफोन Android Pie V9.0 वर आधारीत Color OS 6.1 वर कार्यरत असेल. वजन 172 ग्रॅम असलेल्या या फोनमध्ये 3 कार्ड स्लॉट दिलेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 8:45 am

Web Title: oppo f15 goes on sale check price in india specifications and all you need to know sas 89
Next Stories
1 शरीरातील लिंफोसाइट कमी झाल्यास तुमचा मृत्यू अटळ
2 Sony Walkman चं पुनरागमन, वाय-फाय आणि फास्ट चार्जिंगचा सपोर्टही
3 प्रोस्टेट कर्करोग निदानात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
Just Now!
X